पै. सुभाषभाऊ लोंढे मित्र मंडळाचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांना नगरसेवक पै. सुभाषभाऊ लोंढे मित्र मंडळाच्या वतीने अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. चितळे रोड येथे मानाचा श्री विशाल गणपतीचे आगमन झाले असता, पै. मनोज लोंढे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

आरतीनंतर अल्पोपहार वाटपाला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ॲड. अक्षय दांगट, महेश चव्हाण, निलेश मुथा, सुरेश शिंदे, गणेश पाटील, निखिल गांधी, संदीप शिंदे, पराग मुथा, पंकज धेंड, गणेश पाटील, अमोल पासकंटी, कैलास संदूपटला, अनिकेत बोंडगे, विवेक कुंटला, सचिन क्षीरसागर, मनोज वडीशेरला, सतीश संदूपटला आदी उपस्थित होते.
