प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या कार्याचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जिल्हा परिषद जगदंबा क्लास शाळेच्या शिक्षिका किशोरी शिवाजी भोर यांना शिक्षक दिनानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस व माजी प्राचार्य खासेराव शितोळे यांच्या हस्ते भोर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
टिळकरोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी जुबेर पठाण, संयोजन समितीचे प्रा. माणिक विधाते, ज्ञानदेव पांडुळे आदी उपस्थित होते.
भोर या केडगाव येथील जिल्हा परिषदेच्या जगदंबा क्लास प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. त्या गरजू व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष योगदान देत आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवून दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना सातत्याने आधार देण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल केडगाव बीटच्या विस्तार अधिकारी निर्मला साठे, केडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख बाळासाहेब दळवी, मुख्याध्यापक किसन दुधाडे, राजेंद्र वाघमारे, तंत्रस्नेही शिक्षक राजेंद्र वाबळे, सिमा खाजेकर, बबन कुलट, अनिलकुमार ढवळे, सुषमा तरडे यांनी अभिनंदन केले आहे.
.
