• Wed. Oct 29th, 2025

शहरात प्रथमच मिळणार खवय्यांना इटालियन थाळीचा आस्वाद

ByMirror

Aug 30, 2024

गुलमोहर रोड येथे द डी पिझ्झा रेस्टॉरंटचा शुभारंभ

शहरातील हॉटेल, रेस्टॉरंटने अनेकांना रोजगार मिळाला -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- फास्टफुडच्या युगात खवय्यांच्या जीभेला पिझ्झासह इटालियन थाळी व विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद देण्यासाठी गुलमोहर रोड येथे द डी पिझ्झा रेस्टॉरंटचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी घर घर लंगर सेवेचे जनक आहुजा, हरजीतसिंह वधवा, राजेश जग्गी, गौरव फिरोदिया, प्रमोद कांबळे, रेस्टॉरंटचे संचालक जस्मितसिंह वधवा, महेश काळे, हरीश तावरे, डॉ. संजय असनानी, डॉ. अमित बडवे, प्रशांत मुनोत, जवाहरे नगरवाला, जीतू गंभीर, मनिषकौर वधवा, सनी वधवा आदी उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मुंबई, पुणेच्या धर्तीवर शहरात हॉटेल, रेस्टॉरंट संस्कृती झपाट्याने वाढत आहे. कुटुंब घराबाहेर पडून हॉटेल, रेस्टॉरंटचा आस्वाद घेताना दिसतात. युवक-युवतींचा रेस्टॉरंटकडे कल अधिक वाढत आहे. हॉटेल, रेस्टॉरंटच्या व्यवसायाने अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. द डी पिझ्झाचे दर्जेदार फास्टफुडचे खाद्य पदार्थ नगरकरांच्या पसंतीस उतरणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


गुलमोहर रोड, फिजिक्सवाला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या द डी पिझ्झा रेस्टॉरंट नगरकरांच्या सेवेत दाखल झाला आहे. या रेस्टॉरंट माध्यमातून सर्व प्रकारचे फास्टफुड व इतर खाद्य उपलब्ध होणार आहे. शहरात प्रथमच इटालियन थाळी या रेस्टॉरंट मध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती जस्मितसिंह वधवा, महेश काळे व हरीश तावरे यांनी दिली. या रेस्टॉरंटला प्रितपालसिंह धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, मुन्नाशेठ जग्गी, सतीश गंभीर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *