अहमदनगर (प्रतिनिधी)- पुणे येथे झालेल्या आयसीएसई राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत अबशाम फिरोज पठाण याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन रौप्य पदक पटकाविले.
अबशाम हा कर्नल परब स्कूलचा विद्यार्थी आहे.
या यशाबद्दल खासदार निलेश लंके यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले आहे. अबशाम हा अहमदनगर जिल्हा पालक संघटनेचे सेक्रेटरी असगर सय्यद यांचा नातू आहे.
