• Wed. Jan 28th, 2026

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत कान, नाक, घसा व त्वचारोग तपासणी

ByMirror

Aug 11, 2024

शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कृतार्थ व सेवाभावाने आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवेचे कार्य -अभय गुगळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- व्याधीने त्रासलेल्या पीडितांच्या वेदना दूर करण्याचे काम आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सुरु आहे. कृतार्थ व सेवाभावाने आरोग्य सेवेचे कार्य सुरू असून, सर्वसामान्यांना अद्यावत व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सातत्याने भर पडत आहे. या सेवा कार्यात हातभार लावण्याचे भाग्य मिळत असल्याचे उद्योजक अभय गुगळे यांनी केले.


जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 124 व्या जयंतीनिमित्त स्व. कमलाबाई गुगळे व स्व. सुवालालजी गुगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ गुगळे परिवाराच्या (एस.बी.जी. ट्रेडर्स) वतीने आयोजित मोफत कान, नाक, घसा व त्वचारोग तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी गुगळे बोलत होते. यावेळी अजित गुगळे, साधनाताई गुगळे, कल्पनाताई गुगळे, सीए सोहन गुगळे, सारिका गुगळे, हर्षल गुगळे, श्रद्धाताई गुगळे, रोनक गुगळे, लक्ष्मीताई गुगळे, श्रुती गांधी, अभिजीत गांधी, संतोष बोथरा, डॉ. प्रकाश कांकरिया, सतीश (बाबूशेठ) लोढा, मानकचंद कटारिया, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, वाचा व भाषा उपचार तज्ञ डॉ. सुकेशिनी गाडेकर, डॉ. अजहर शेख, ऑडिओ मीटर तज्ञ सुरज कर्डिले, त्वचारोग तज्ञ डॉ. भास्कर पालवे, डॉ. अमित शिंदे आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, गुगळे परिवार हॉस्पिटलच्या सेवा कार्यात समर्पण भावनेने योगदान देत आहे. या परिवाराने आनंदऋषीजी हॉस्पिटलला आपले प्रथम कर्तव्य समजून आचार्य ऋषीजींचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वस्वी दिले. त्यांच्या परिवाराच्या प्रत्येक सदस्य तन, मन, धनाने सेवा देत असल्याचे त्यांनी सांगितले.


साधनाताई गुगळे म्हणाल्या की, रोगीसाठी योगीची भूमिका घेऊन दुःखीच्या जीवनात आनंद फुलविण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल करत आहे. दवा बरोबर दुवा देखील येथे मिळत असून, उत्तम प्रकारे सेवाभावाने कार्य सुरु आहे. या सेवाकार्यातूनच आरोग्यसेवेचे रथ पुढे जात आहे. यासाठी सर्वांचा हातभार लागत असून, निरोगी जीवनासाठी हे आरोग्य मंदिर दिशादर्शक भूमिका निभावत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सोहन गुगळे यांनी या हॉस्पिटलच्या समाजकार्यात हातभार लावण्याची मिळालेली संधी हे एक भाग्य असल्याचे स्पष्ट केले.


या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी कान, नाक, घसा तपासणी शिबिरात 80 रुग्णांची तर त्वचारोग असलेल्या 50 रुग्णांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *