भ्रष्ट मार्गाने मोठ्या प्रमाणात अवैध संपत्ती मिळवल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महापालिकेतील तत्कालीन सहाय्यक संचालक व पुणे प्राधिकरण नगररचना विभागात कार्यरत असलेले त्या अधिकारीच्या संपत्तीची चौकशी करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मेहेर कांबळे यांनी मंगळवारी (दि.6 ऑगस्ट) पुणे गुलटेकडी येथील आयकर विभागाच्या कार्यालया समोर उपोषण केले. त्या अधिकाऱ्याने भ्रष्ट मार्गाने मोठ्या प्रमाणात अवैध संपत्ती मिळवली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
अहमदनगर महानगरपालिकेतील तत्कालीन सहाय्यक संचालक पदावर असलेले व पुणे प्राधिकरण नगर रचना विभागात कार्यरत असलेले त्या अधिकाऱ्यावर बीड व नगरमध्ये कार्यरत असताना वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. मात्र त्यांच्या संपत्तीची कोणत्याही प्रकारे चौकशी झालेली नाही. त्या अधिकाऱ्याने पत्नी, मुलगी, भाऊ, मेहुणी व इतर नातेवाईक यांच्या नावावर अनेक प्लॉट, घर, गाड्या व इतर मौल्यवान खरेदी केलेले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
यासंदर्भात आयकर विभागाला लेखी स्वरूपात तक्रार देऊनही त्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई झालेली नाही. या प्रकरणी त्या अधिकाऱ्याच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
अहमदनगर मनपातील तत्कालीन सहाय्यक संचालक व पुणे प्राधिकरण नगररचना विभागात कार्यरत असलेल्या त्या अधिकारी व नातेवाईकांच्या संपत्तीची चौकशी केल्यास मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता आहे. मात्र प्रशासन याकडे आर्थिक हितसंबंध ठेवून दुर्लक्ष करीत आहे. त्या अधिकाऱ्याच्या संपत्तीची चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाणार. -मेहेर कांबळे (जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन युवा सेना)