एकदातरी पंढरीची वारी जीवनात केली पाहिजे -प्रा. संदीप भोर
अहमदनगर (प्रतिनिधी)- सरस्वती विद्या मंदिर प्रशालेचे रौप्य महोत्सव व आषाढी निमित्त शनिवारी (दि.20 जुलै) शिक्षणाची वारी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. तर गुरुपौर्णिमा देखील साजरी करण्यात आली.
या सोहळ्यासाठी ह.भ.प. तुळशीराम लबडे (सर) महाराज उपस्थित होते. लबडे महाराज यांनी पंढरीच्या वारीतून जीवनात शिकण्यासारखे अनेख गोष्टी असून, वारी कशासाठी करायची? तसेच शिक्षणाची वारी, जीवनाची वारी व पसायदानाचे महत्त्व मुलांना सांगितले. सर्व वारीचा शेवट म्हणजे फक्त जीवनचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. तर गुरुचे जीवनातील महत्त्व विशद केले.
प्रमिला कार्ले यांनी गुरुपौर्णिमेविषयी विद्यार्थ्यांना आपल्या गीतातून गुरुची महती सांगितली. डॉ. रविंद्र चोभे यांनी रंजक गोष्टीतून विद्यार्थ्यांना गुरुचे महत्त्व स्पष्ट केले. एकदातरी पंढरीची वारी जीवनात करण्याचे आवाहन प्रा. संदीप भोर यांनी केले. यावेळी प्रा. मणिकराव विधाते, अविनाश साठे, शिवाजी मगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रांगणात रिंगण सोहळा पार पडला. विठ्ठलाच्या गाण्यवार विद्यार्थ्यांनी नृत्याचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षिका यांनी फुगड्यांचा फेर धरला होता. टाळ-मृदुंगाच्या निनादात विठ्ठलाचा गजर केला. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम, मुक्ताबाई, संत नामदेव अशा विविध संतांची वेशभूषा करून दिंडीत सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थी, पालक व सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता खिलारी यांनी केले.