• Thu. Oct 16th, 2025

अंगारकी चतुर्थीनिमित्त उद्योजक रवी बक्षी व सौ.सुनिता बक्षी यांच्या हस्ते गणेश याग संपन्न

ByMirror

Jun 26, 2024

बक्षी परिवाराच्या वतीने श्री विशाल गणेशास 1 लाख रोख व सोन्याची चेन अर्पण

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या पूजनाने होत असते. अंगारकी चतुर्थीनिमित्त गणेश याग पुजेतून मोठे समाधान मिळाले आहे. मनोभावे श्री गणेशाची सेवा केल्याने आपल्या जीवनात आनंद निर्माण होत आहे. श्री विशाल गणेश मंदिराचा झालेला जिर्णोद्धार व विकास हा नेत्रदिपक असाच आहे. तसेच देवस्थानचे उपक्रम व देत असलेल्या सेवा-सुविधांमुळे मंदिराची प्रचिती सर्वदूर पोहचत असल्याचे प्रतिपादन उद्योजक रवी बक्षी यांनी केले.


शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त उद्योजक रवी बक्षी व सौ.सुनिता बक्षी यांच्या हस्ते गणेश याग संपन्न झाला. यावेळी बक्षी परिवाराच्या वतीने विशाल गणेश मंदिरास 1 लाख रुपये रोख व एक सोन्याची चेन भेट देण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष ॲड. अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोक कानडे, उद्योजक जनक आहुजा, विश्‍वस्त प्रा.माणिकराव विधाते, पांडूरंग नन्नवरे, गजानन ससाणे, विजय कोथिंबीरे, नितीन पुंड, राजेंद्र एकाडे आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना बक्षी म्हणाले की, गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांची संख्या दिवसंदिवस वाढत आहे. मंदिराच्या कार्यात बक्षी परिवाराच्या वतीने नेहमीच योगदान राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


अभय आगरकर म्हणाले की, श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्या वतीने भाविकांना जास्तीत-जास्त सुविधा देण्यात येत आहे. आज अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिर परिसरात दर्शनास येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मंडप टाकण्यात आला आहे. तर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, विविध धार्मिक कार्यक्रमाने प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे.

भाविकांची गर्दी लक्षात घेता देवस्थानच्यावतीने नियोजन करुन सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे स्पष्ट केले.
देवस्थानच्या वतीने बक्षी परिवाराचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे यांनी देवस्थानच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. प्रा. माणिक विधाते यांनी आभार मानले. चतुर्थीनिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *