• Sun. Oct 26th, 2025

कवियत्री विद्या भडके यांच्या अनमोल भेट कथासंग्रहाचे प्रकाशन

ByMirror

Jun 19, 2024

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील शिक्षिका तथा कवियत्री विद्या भडके लिखित अनमोल भेट या कथासंग्रहाचे प्रकाशन काव्य संमेलनात पार पडले. माऊली प्रतिष्ठान संचलित नाते शब्दांचे साहित्य मंचच्या वतीने कोपरगावच्या बालाजी नगर येथील ब्राह्मण सभा हॉलमध्ये झालेल्या चौथे राज्यस्तरीय काव्य संमेलनात या कथासंग्रहाचे प्रकाशन झाले.


या कार्यक्रमासाठी संमेलनाचे उद्घाटक तथा महानंदा दूध उत्पादक संघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रबापू जाधव, संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव, ज्येष्ठ साहित्यिका वनमाला पाटील आदी उपस्थित होत्या.


विद्या भडके यांना अनमोल भेट हा कथासंग्रह लिहिण्यासाठी मिळालेली प्रेरणा, यात असलेला विषय आणि आशय त्याचबरोबर अनमोल भेटबाबतचा परिचय करुन दिला. हा कथासंग्रह नक्कीच सर्व वाचकांच्या पसंतीस उतरेल असा विश्‍वास भडके यांनी व्यक्त केला. याप्रसंगी ज्ञानेश्‍वर शिंदे, बाळासाहेब देवकर, चंदनताई तरवडे, डॉ.जी.के. ढमाले. नंदकिशोर लांडगे, पंडित निंबाळकर, कल्पना देशमुख, भावना गांधीले, दिनेश चव्हाण, अनिल धाडगे, गणेश धाडगे, साक्षी धाडगे यांच्यासह अनेक कवी व साहित्यिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *