• Wed. Mar 12th, 2025

चारधाम यात्रेस गेलेल्या विमल वाबळे यांचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन

ByMirror

Jun 14, 2024

अहमदनगर (प्रतिनिधी)- चारधाम यात्रेस गेलेल्या पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथील विमल भिमराज वाबळे यांचे उत्तराखंड येथे बुधवारी (दि.12 जून) ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 56 वर्षाच्या होत्या.


पिंपळगाव वाघा येथून 40 भाविक नुकतेच चार धाम यात्रेस रवाना झाले होते. उत्तर काशी येथील जानकी चट्टान, बडकोट तिर्थ यमोनोत्री येथे दर्शन सुरु असताना विमल वाबळे यांची तब्यत खालावून त्यांना ह्रद्यविकाराचा झटका आला.

यामध्ये ते मयत झाल्या. माजी सैनिक भिमराज वाबळे यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्‍चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *