• Mon. Jan 26th, 2026

कौटुंबिक न्यायालय वकील संघाची नुतन कार्यकारणी बिनविरोध

ByMirror

Jun 14, 2024

अध्यक्षपदी ॲड. कचरे, उपाध्यक्षपदी ॲड. लगड, कार्याध्यक्षपदी ॲड. सांगळे व सचिवपदी ॲड. कावरे यांची निवड

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कौटुंबिक न्यायालय अहमदनगर वकील संघाची नुतन कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी ॲड. लक्ष्मण बबन कचरे, उपाध्यक्षपदी ॲड. सुरेश आबासाहेब लगड, कार्याध्यक्षपदी ॲड. शिवाजी राधाकृष्ण सांगळे व सचिवपदी ॲड. राजेश दत्तात्रय कावरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


या वकील संघाची प्रत्येक दोन वर्षांनी होणारी सभा नुकतीच पार पडली. सभेत अनेक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये नवीन कार्यकारणी नियुक्ती करण्यासंदर्भात ॲड. शिवाजी सांगळे यांनी सूचना मांडल्या. त्या अनुषंगाने अध्यक्षपदी ॲड. लक्ष्मण कचरे तर उपाध्यक्ष ॲड. सुरेश लगड यांची एकमताने निवड करण्यात आली.

तसेच कार्याध्यक्षपदी ॲड. शिवाजी सांगळे, सचिवपदी ॲड. राजेश कावरे व सहसचिवपदी ॲड. रोहिणी उंडे-नगरकर, खजिनदारपदी ॲड. बाबाजी दामोदर सांगळे यांच्यासह कार्यकारिणी सदस्यपदी ॲड. शिवाजी कराळे, ॲड. उमेश नगरकर, ॲड. मच्छिंद्र आंबेकर, ॲड. कल्याण पागर, ॲड. अनिता दिघे, ॲड. पोपट म्हस्के, ॲड. प्रणाली भुयार याची पुढील दोन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. नुतन पदाधिकारी व सदस्यांचे अहमदनगर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. संजय पाटील, ॲड. भूषण बऱ्हाटे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *