• Wed. Oct 29th, 2025

पर्यावरणाचा जागर करुन 1 जूनचा सामुदायिक वाढदिवस साजरा

ByMirror

Jun 1, 2024

निमगाव वाघात वृक्षरोपण

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वात मोठा सरकारी वाढदिवस म्हणजे 1 जून, पूर्वी गुरुंजींनी मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी दाखवलेल्या जन्मदिनांकामुळे अनेकांचे वाढदिवस या दिवशी येतात. निमगाव वाघा (ता. नगर) येथे शनिवारी (दि. 1 जून) अनेकांचे सामुहिक वाढदिवस ग्रामस्थांनी वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत साजरा केला.


सावता महाराज मंदिर परिसरात वाढदिवस असलेले ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, दत्ता फलके, लक्ष्मण चौरे, छगन भगत, चंद्रकांत जाधव, भास्कर उधार, तुकाराम फलके, नामदेव फलके यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी अखिल वारकरी सेवा मंडळाचे राज्य अध्यक्ष ह.भ.प. बलभीम महाराज पठारे, सचिव ह.भ.प. किशोर महाराज पठारे, कर्जत तालुकाध्यक्ष ह.भ.प. छगन महाराज गांगर्डे, रघुनाथ डोंगरे, गोरख गायकवाड, भाऊसाहेब आनंदकर, बाबा खळदकर, ज्ञानदेव जाधव, काशीनाथ जाधव, तुलशीराम वाघुले, अतुल फलके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळविण्यासाठी वृक्षरोपणाशिवाय पर्याय नाही. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचे प्रश्‍न बिकट बनले आहे. प्रत्येकाने आपला वाढदिवस वृक्षरोपणाने करुन ते जगविण्याचा संकल्प करण्याचे त्यांनी सांगितले. ह.भ.प. बलभीम महाराज पठारे यांनी गुरुंजीनी 1 जून हा अनेकांना दिलेला वाढदिवस आहे. हा आगळा-वेगळा सोहळा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने उपयुक्त साजरा करण्यात आल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *