पहिल्याच सामन्यात नगरला मिळाला बाय तर पुढील सामना अमरावती बरोबर
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत शिरपूर (जि. धुळे) येथे सुरु झालेल्या बारा वर्षाखालील आंतर जिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप सब ज्युनिअर स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचा मुलांचा संघ रवाना झाला आहे. पहिल्याच सामन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या संघाकडून अहमदनगरच्या संघाला बाय मिळाला असून, पुढील सामना अमरावती बरोबर होणार आहे.
अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने जिल्ह्याचा संघ निवडीसाठी गेल्या पंधरा दिवसापासून भुईकोट किल्ला मैदान येथे निवड चाचणी शिबिर पार पडले. यामध्ये विविध फुटबॉल क्लबच्या मुलांनी सहभाग नोंदवला होता. असोसिएशनच्या निवड समितीचे सदस्य मुख्य प्रशिक्षकराजेंद्र पाटोळे, प्रशिक्षक अभिषेक सोनवणे, जॉय जोसेफ, सचिव रोनप फर्नांडिस, सहसचिव प्रदीपकुमार जाधव, उपाध्यक्ष खालीद सय्यद यांनी 18 मुलांची जिल्ह्याच्या संघात निवड केली आहे.
यामध्ये कर्णधार- भार्गव संदीप पिंपळे, उपकर्णधार माहीर ललित गुंदेचा, यदुवर विजय कोकरे, इंद्रजीत संदीप गायकवाड, स्तवन किरण ठोंबरे, विराज सचिन दिघे, नमन सौरभ दिवाणी, जोएब महेंद्र साठे, वीरेंद्र जालिंदर वीर, सोहेल रहीम खान, श्रेयस संदीप बोठे, राजवर्धन महेश वीर, अनुज सुनील दरेकर, अविनाश बालाजी वल्लाळ, सियॉन सुनील बागुल, आयुष महेंद्र गाडळकर, देवांश गणेश झरेकर, पियुष उमेश म्हैसमाळ या खेळाडूंचा समावेश आहे.
संघ निवडीसाठी अहमदनगर फुटबॉल असोसिएशनचे सचिव रोनक फर्नांडिस, उपाध्यक्ष खालीद सय्यद, सहसचिव प्रदीप कुमार जाधव, एक्झिक्युटिव्ह मेंबर पल्लवी सैंदाणे, मुख्य प्रशिक्षक राजेंद्र पाटोळे, जॉय जोसेफ, जेव्हिअर स्वामी यांनी परिश्रम घेतले. संघाला जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, खजिनदार राणा परमार यांनी शुभेच्छा दिल्या. संघ बरोबर मॅनेजर म्हणून मनीष राठोड व अभिषेक सोनवणे गेले आहेत.