• Mon. Oct 27th, 2025

धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास काव्य संग्रहाची भेट

ByMirror

May 11, 2024

कथा व काव्य संग्रहातून जीवनातील संघर्षाला प्रेरणा मिळते -सरोज आल्हाट

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास कवयित्री सरोज आल्हाट यांनी स्वत: लिहिलेल्या महिलांच्या संघर्षमय जीवन प्रकट करणारा अनन्यता काव्य संग्रहाचा संच भेट दिला. वाचनालयाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांच्याकडे पुस्तके सुपुर्द करण्यात आले.


सरोज आल्हाट म्हणाल्या की, कथा व काव्य संग्रहातून जीवनातील संघर्षाला प्रेरणा मिळत असते. वाचन संस्कृती लोप पावली जात असताना युवक-युवतींमध्ये अपयश पचविण्याची व आयुष्यातील संकटांना तोंड देण्याची क्षमता कमी होत चालली आहे. वाचनाने मन समृध्द होऊन मनुष्याला स्फूर्ती मिळत असते. अनन्यता काव्य संग्रह जीवनातील संघर्ष असून, या काव्य संग्रहातून ग्रामीण भागातील युवक-युवतींना प्रेरणा मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, माहिती अनुभव, ज्ञान व शहाणपण पुस्तकंच देतात. पुस्तकांनी माणुस घडतो, व्यक्ती म्हणून त्याचा विकास होतो. सुसंस्कारीत समाज निर्मितीसाठी वाचन आवश्‍यक आहे. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न वाचनालयाच्या माध्यमातून सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *