• Thu. Jan 1st, 2026

आगडगाव येथील काळभैरवनाथ देवस्थान परिसरात पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची सोय

ByMirror

May 7, 2024

उन्हाळ्यात पक्ष्यांना वाचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भालसिंग यांचा पुढाकार

झाडाला टांगले धान्य व पाण्याची भांडी

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्यात तीव्रतेने वाढत चाललेले तापमानात पक्ष्यांना जगणे सुसह्य व्हावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी आगडगाव (ता. नगर) येथील श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान (ट्रस्ट) परिसरातील झाडांवर पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची सोय केली. झाडाला धान्य व पाण्याची भांडी टांगण्यात आली. उन्हाळ्यात वाढत्या तापमानात पक्ष्यांना वाचविण्यासाठी भालसिंग यांनी हा सामाजिक उपक्रम हाती घेतला असून, विविध ठिकाणी ते पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची सोय करत आहे.


या उपक्रमाप्रसंगी श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष बलभीम कराळे, उपाध्यक्ष साहेबराव गायकवाड, सचिव त्रिंबक साळुंके, खजिनदार दिलीपकुमार गुगळे, सल्लागार मुरलीधर कराळे, वाळकीचे संजय भालसिंग, विश्‍वस्त संभाजी कराळे, दिलीप गायकवाड, तुळशीदास बोरुडे, नितीन कराळे आदी उपस्थित होते.


दिवसं-दिवस उन्हाची तीव्रता वाढत असताना 40 अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. पक्षी पाण्यासाठी व अन्नासाठी भटकंती करीत आहे. वाढत्या तापमानात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागत आहे. ही जाणीव ठेऊन विजय भालसिंग यांनी डोंगर रांगा व मालरान येथील झाडांवर धान्य व पाण्याची भांडी टांगून पक्ष्यांची सोय करत आहे.


बळभीम कराळे म्हणाले की, पशुसेवा ही ईश्‍वरसेवाच आहे. मुक्या प्राण्यांना दया दाखविणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. भालसिंग यांनी राबवलेला उपक्रम युवकांसाठी आदर्श व दिशादर्शक आहे. उन्हाळ्यात तापमान झपाट्याने वाढत असताना पक्ष्यांसाठी ठिकठिकाणी अन्न-पाणीची सोय केल्यास ते जगू शकणार असल्याचे स्पष्ट केले. देवस्थानचे पदाधिकारी व विश्‍वस्तांनी भालसिंग यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.


विजय भालसिंग यांनी पशु-पक्ष्यांना जगविणे ही मनुष्याची नैतिक जबाबदारी आहे. निसर्गात मनुष्याने केलेल्या हस्तक्षेपामुळे तापमान वाढत चालले आहे. उन्हाळ्यात पक्षांना वाचवण्यासाठी सर्वांना जबाबदारी घ्यावी लागणार असल्याचे भालसिंग यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *