• Mon. Oct 27th, 2025

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

ByMirror

Apr 15, 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करुन जय भीमचा गजर

बाबासाहेबांच्या राज्यघटनेने समाजातील उपेक्षितांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला -सुनिल साळवे

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जय भीम व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष केला.


या अभिवादन कार्यक्रमासाठी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, जिल्हा सरचिटणीस विजय भांबळ, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश त्रिभूवन, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, महिला जिल्हाध्यक्षा आरतीताई बडेकर, महिला शहर जिल्हाध्यक्षा मायाताई जाधव, युवती जिल्हाध्यक्षा सारिका गांगुर्डे, क्रांती जगताप, लोकेश बर्वे, शिवाजी साळवे, अविनाश भोसले, कृपाल भिंगारदिवे, शुभम भिंगारदिवे, शुभम भिंगारदिवे, आकाश भालेराव, अनिकेत कांबळे, शिवाजी शिरोळे, आप्पासाहेब गायकवाड, प्रशांत घोडके, प्रमोद घोडके, गौरव भिंगारदिवे, करण भिंगारदिवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सुनिल साळवे म्हणाले की, देशासह संपूर्ण जगात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. हे या महामानवाचे कार्य व महात्म्य आहे. सर्व जातीचा अभ्यास करुन त्यांनी सर्वांना समान हक्क देण्याचा प्रयत्न केला. गरीब-श्रीमंत, उच्च-निच्च हा भेदभाव न ठेवता सर्वांना मताचा समान अधिकार दिला.

जनसामान्यांच्या कल्याणासाठी राज्यघटना अस्तित्वात आली. बाबासाहेबांच्या राज्यघटनेने समाजातील उपेक्षितांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला. बाबासाहेबांच्या विचाराने समाजाला दिशा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *