विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
गावात नाचून, वाचून व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देवून बाबासाहेबांची जयंती साजरी -विजय भालसिंग
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. समाजाला शिका संघटित व्हा व संघर्ष करा, असा संदेश देणारे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गावातील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी पेनचे वाटप केले.
यावेळी सरपंच शरद बोठे, माजी सरपंच संग्राम गायकवाड, डॉ. डॅनियल आरवडे, प्रविण गायकवाड, सतीश गायकवाड, वैभव गायकवाड, जनार्धन गायकवाड, आशिष आरोळे, महेश गायकवाड, सुजित आरवडे, रेव्ह. वाघमारे, शरद गायकवाड, बब्बू पठाण आदी उपस्थित होते.
तसेच गावातील आंबेडकरी अनुयायी तरुणांनी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. विजय भालसिंग म्हणाले की, गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती नाचून, वाचून व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देवून साजरी करण्यात आली आहे. बाबासाहेबांच्या विचाराने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन समाजाचा विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उच्च शिक्षित होवून बाबासाहेबांनी समाजाला दिशा दिली. तर त्यांच्यामुळे वंचितांना मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
सरपंच शरद बोठे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे देशात समता, स्वातंत्र्य व बंधुत्व निर्माण झाले. त्यांचे जीवन चरित्र जगभर अभ्यासले जात असून, परदेशातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांचे धडे शिकवले जातात. आजच्या युवकांनी आपल्या मीतात घडलेल्या महामानवाचे विचारांचे पाईक होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी सरपंच संग्राम गायकवाड व डॉ. डॅनियल आरवडे यांनी मनोगत व्यक्त केले.
