• Tue. Nov 4th, 2025

रिपब्लिकन युवा सेना संविधान विरोधी व जातीयवादी पक्षाच्या उमेदवारा विरोधात

ByMirror

Apr 13, 2024

लोकसभा जिल्हा क्षेत्र अध्यक्षपदी मेहेर कांबळे यांची नियुक्ती; विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

समाजातील प्रश्‍न सुटावे व वंचित समाजाला न्याय मिळावा या अपेक्षेने राजकारणात सक्रीय -मेहेर कांबळे

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक टिळक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पार पडली. या बैठकीत संविधान विरोधी व जातीयवादी विचाराने कार्य करणाऱ्या पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारा विरोधात काम करण्याची भूमिका मांडण्यात आली. तर लोकसभा जिल्हा क्षेत्र अध्यक्षपदी जिल्हा संघटक मेहेर कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली.


रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


चंद्रकांत जाधव म्हणाले की, रिपब्लिकन युवा सेनेने गाव तिथे शाखा सुरु करुन घराघरात सामाजिक कार्य पोहचविले आहे. मोठ्या संख्येने तळागाळातील जनसमुदाय संघटनेला जोडला गेला आहे. त्यांचे प्रश्‍न सोडवण्याचे कार्य सातत्याने सुरू असून, जातीयवादी शक्तीमुळे सर्वसामान्यांचे प्रश्‍न अधिक बिकट होत आहे. या लोकसभा निवडणुकीत संविधान विरोधी कार्य करणाऱ्या व जातीयवादी विचारसरणीच्या पक्षातील उमेदवारांच्या विरोधात काम केले जाणार आहे. तर शाहू, फुले, आंबेडकर विचारधारेने कार्य करणाऱ्यांचे काम करुन त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


मेहेर कांबळे म्हणाले की, समाजातील प्रश्‍न सुटावे व वंचित समाजाला न्याय मिळावा या अपेक्षेने रिपब्लिकन युवा सेना राजकारणात सक्रीय आहे. समाजकारण हे एकमेव ध्येय समोर ठेवून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यात येत आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पूर्ण करुन, पक्ष आदेशानुसार लोकसभा उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा महासचिव अमोल मकासरे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन त्यांना मार्गदर्शन केले.


रिपब्लिकन युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पुढील प्रमाणे:-
शहर जिल्हाध्यक्ष- किरण जाधव, प्रसिध्दी प्रमुख दिपक मकासरे.
राहुरी तालुकाध्यक्ष- योगेश पवार.
नेवासा तालुकाध्यक्ष- गणेश भालेराव, संघटक- सिताराम वायकर, महासचिव- अरबाज शेख, कार्याध्यक्ष- सुंदर रामगुडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *