• Wed. Feb 5th, 2025

जगातील सर्वात अवघड साऊथ आफ्रिका मॅरेथॉनसाठी नगरचे 4 धावपटू पात्र

ByMirror

Apr 25, 2022

नगरच्या धावपटूंनी गाजवली कोल्हापूरची मॅरेथॉन

अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोनाच्या तब्बल दोन वर्षानंतर कोल्हापूरला झालेल्या कोल्हापूर मॅरेथॉन 2022 मध्ये नगर रायझिंग रनर्स व एसपीजे स्पोर्टस क्लबच्या धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदवला. कोल्हापूर रगेडियन अ‍ॅण्ड स्पोर्टस क्लबच्या वतीने घेण्यात आलेली मॅरेथॉन नगरच्या धावपटूंनी गाजवली. रितेश खंडेलवाल व किशोर टकले 50 कि.मी. च्या गटात स्पर्धा उत्तमपणे पुर्ण केली. प्राची पवार या महिलेनेही 42 कि.मी. ची मॅरेथॉन पुर्ण केली.
ही मॅरेथॉन अत्यंत उत्साह व जोशपुर्ण वातावरणात पार पडली. यामध्ये संपुर्ण महाराष्ट्र तसेच देशातील विविध राज्यातून नामवंत धावपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्व रनर्सना मॅरेथॉनसाठी नगर रायझिंग रनर्स व एसपीजे स्पोर्टस क्लबचे संदीप जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी धावपटूंबरोबर पेसर म्हणून 21 कि.मी. च्या गटात स्पर्धा यशस्वी पुर्ण केली.

42 कि.मी. गटात- सुनिल बनकर, राजेश पालवे, 21 कि.मी. गटात- सतबीर गोत्रा, मनिषा विटेकर, सागर डोलारे, नमन खंडेलवाल, दिपक खंडेलवाल, अमोल तांगल, हरविंदर नारंग, सोहम कुलकर्णी, मिलिंद महाजन, 10 कि.मी. गटात- गायत्री राणे, दिव्या राणे, केतकी महाजन, संस्कृती भडके, संतोष पंतम, विराज मुनोत, सागर थोरवे, अभिजीत मिसाळ, चिन्मय नगरकर, हेमंत लोहगावकर या धावपटूंनी स्पर्धा पुर्ण केली. कोरोनानंतर झालेल्या या मॅरेथॉनमध्ये सर्व धावपटूंचा उत्साह संचारला होता.

जगातील सर्वात अवघड मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणार्‍या साऊथ आफ्रिका मॅरेथॉनसाठी नगर रायझिंग रनर्स व एसपीजे स्पोर्टस क्लबचे सदस्य असलेले 4 धावपटू पात्र ठरले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेला शंभर वर्षाचा इतिहास असून, पहिल्या महायुध्दात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही मॅरेथॉन घेतली जाते. आंतरराष्ट्रीय दर्जाची ही मॅरेथॉन लवकरच साऊथ आफ्रिका येथे होणार असून, 90 कि.मी. च्या गटात नगरचे धावपटू किशोर टकले, रितेश खंडेलवाल, सुनिल बनकर, राजेश पालवे धावणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *