छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उपक्रम
महाराजांचा आदर्श समोर ठेवून आपचा हुकूमशाहा व जातीयवादी शक्ती विरोधात लढा -भरत श्रीराम खाकाळ
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती रक्तदानाने साजरी करण्यात आली. दिल्लीगेट येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह युवकांनी रक्तदान केले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन रक्तदान शिबिराचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी आपचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, महिला अध्यक्षा विद्या शिंदे, महासचिव प्रकाश फराटे, प्रवक्ते ॲड. महेश शिंदे, सचिव अशोक डोंगरे, उपाध्यक्ष नितीन लोखंडे, गणेश मारवाडे, सिताराम खाकाळ, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र सामल, कला सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष प्रकाश वडवणीकर, अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष तुकाराम भिंगारदिवे, युवा आघाडीचे अध्यक्ष अनिल साळवे, शिक्षक आघाडीचे अध्यक्ष रवी सातपुते,युवा आघाडी उपाध्यक्ष विजय लोंढे,सदस्य अंबादास जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
भरत खाकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक मावळ्यांनी स्वराज्यासाठी योगदान देवून रक्त सांडले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करुन समजासाठी आणि जणतेसाठी रक्तदान करण्यात आले आहे. महाराजांचा आदर्श समोर ठेवून आपच्या वतीने हुकूमशाहा व जातीयवादी शक्ती विरोधात लढा दिला जात आहे. आपचे सरकार सत्तेवर आल्यास ते सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करणारे ठरणार आहे. महाराजांची स्वराज्य निर्माण करताना अठरापगड जातीचे मावळे व बारा बलुतेदार यांना एकत्र करुन स्वराज्य निर्माण केले. आदर्श राज्य कारभार करताना त्यांनी कधीही जातीयवाद व भेदभाव केला नाही. मात्र सत्ताधारी फक्त महाराजांचे नाव घेवून आणि मार्फत त्यांच्या विचारांच्या विरोधात कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक ही हुकूमशाही पध्दतीने राजकीय सुड घेण्याच्या भावनेने झाली असल्याचे स्पष्ट करुन उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. राजेंद्र सामल यांनी शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून सत्ताधारी हुकूमशाही सरकारला या निवडणुकीत उखडून टाकले पाहिजे.
समाजात असहिष्णुता निर्माण करुन भावनिक राजकारण करणारे जुमले बाज सरकारला योग्य ती जागा दाखविण्याचे त्यांनी आवाहन केले. या रक्तदान शिबिरासाठी अहमदनगर ब्लड बँकचे सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी रक्तपिढीच्या विद्या पचारणे, सिद्धांत शेवाळे यांनी परिश्रम घेतले.