रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
अनेकांचे संसार उध्वस्त होवून, युवक व्यसनाच्या आहारी जात असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- सोलापूर रोड, वाकोडी फाटा परिसरात सर्रासपणे सुरु असलेले अवैध धंदे, मटका, जुगार, हातभट्टी, दारू बंद करण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. यावेळी वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप वाघचौरे, रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, गुलाम शेख, विजय शिरसाठ, सुधीर गायकवाड, मुन्ना भिंगारदिवे, विनीत पाडळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
वाकोडी फाटा परिसरात अवैध धंद्याचा बाजार फोफावला आहे. हातभट्टी, दारू, मटका, जुगार, गांजा यांसारख्या अनेक अवैधधंदे सर्रास सुरू आहे. दरेवाडी, वाकोडी फाटा परिसरात लोकवस्तीमध्ये हा प्रकार सुरु आहे. यामुळे गंभीर व्यसन करणाऱ्या युवकांचे प्रमाण वाढले आहे. अनेकांचे संसार उध्वस्त होत असून, व्यसनामुळे अनेकांचे कुटुंब तुटले आहेत. अनेक तरुण हातभट्टी सारखी दारुच्या आहारी जावून मृत्युमुखी पडले आहेत. तर जुगारामुळे युवक कर्जबाजारी होत आहे. पोलीस प्रशासन या अवैधधंद्यावर ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आला आहे.
सोलापूर रोड, वाकोडी फाटा परिसरात सर्रासपणे सुरु असलेले अवैध धंद्यांवर कारवाई करुन ते त्वरीत बंद करावे, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा रिपाईच्या वतीने देण्यात आला आहे.