परीक्षा केंद्रावर पेन व गुलाबपुष्पाचे वाटप
विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाच्या परीक्षेस आज शुक्रवारपासून (दि.1 मार्च) सुरुवात झाली. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने अ.ए.सो.च्या भिंगार हायस्कूल मधील परीक्षा केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांना पेन व गुलाबपुष्प देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढून त्यांना मनमोकळ्या वातावरणात परीक्षेला सामोरे जाता यावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, जालिंदर बोरुडे, अभिजीत सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, रविंद्र बाकलीवाल, दीपक घाडगे, मनोहर दरवडे, किरण फुलारी, अशोक पराते, विश्वास वाघस्कर, संतोष हजारे, रवींद्र घडसिंग, किशोर भगवाने, ईवान सपकाळ, प्रांजली सपकाळ, ॲड. उध्दव चेमटे, उषा ठोकळ, संगीता दरवडे, चंद्रकला येलुलकर, निर्मला येलुलकर, शाळेचे मुख्याध्यापक एस.आर. पडोळे, उपमुख्यध्यापक आर.व्ही. कासार, पर्यवेक्षिका सौ.एस.पी. गायकवाड, अमोल घोरपडे, एस.के. बनकर आदींसह विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.

संजय सपकाळ म्हणाले की, पहिल्यांदाच बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील दहावी बोर्ड पहिली पायरी असून, या परीक्षेच्या गुणांवर विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य अवलंबून असते.
विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व तणावमुक्त पध्तीने पेपर जाण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक एस.आर. पडोळे यांनी आयोजकांचे आभार मानले.