23 विद्यार्थी अ श्रेणीत, एलिमेंटरीमध्ये सृष्टी भिंगारे राज्यात 43 वी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शासकीय रेखाकला परीक्षेत (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा) अ.ए.सो. च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या दोन्ही परीक्षेत शाळेतील 23 विद्यार्थी अ श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर एलिमेंटरी मध्ये सृष्टी सतीश भिंगारे ही इयत्ता सातवीची विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्यात 43 वा क्रमांक पटकाविला.
एलिमेंटरी परीक्षेत 57 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यातील 56 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत 11 विद्यार्थी अ श्रेणीत, 22 विद्यार्थी ब श्रेणीत तर 23 विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल शेकडा 98.24 टक्के लागला.
इंटरमिजिएट या परीक्षेत विद्यालयातील 56 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यातील 53 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 12 विद्यार्थी अ श्रेणीत, 21 विद्यार्थी ब श्रेणीत तर 20 विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल शेकडा 94.64 टक्के लागला.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, सहकार्यवाह गौरव फिरोदिया व सल्लागार समिती सदस्य भुषण भंडारी यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. विद्यार्थ्यांचे स्कूलचे प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कला शिक्षक सुनिल जोर्वेकर व अमृता सोनार यांचे मार्गदर्शन लाभले.