• Mon. Jul 21st, 2025

आम आदमी पार्टीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

ByMirror

Feb 21, 2024

जिल्हा प्रवक्तेपदी ॲड. शिंदे, जिल्हा सचिवपदी प्रा. डोंगरे, जिल्हा महासचिवपदी इंजि. फराटे तर कार्यालय प्रमुखपदी ढाकणे यांची नियुक्ती

दिल्ली, पंजाबच्या धर्तीवर आप महाराष्ट्रात परिवर्तन करणार -ॲड. महेश शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवडी जाहीर करण्यात आल्या. जिल्हा प्रवक्तेपदी ॲड. महेश शिंदे, जिल्हा सचिवपदी प्रा. अशोक डोंगरे, जिल्हा महासचिवपदी इंजि. प्रकाश फराटे तर कार्यालय प्रमुखपदी नामदेव ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली.


आम आदमी पार्टीचे प्रदेश सहप्रभारी गोपाल इटालिया, प्रदेश कार्याध्यक्ष अजित फाटके, जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांनी पदाधिकाऱ्यांच्या निवडची घोषणा केली. ॲड. शिंदे मागील 20 वर्षापासून सामाजिक चळवळीत तर दहा वर्षापासून आपमध्ये कार्य करत आहे. तर प्रा. डोंगरे, इंजि. फराटे तर ढाकणे अनेक वर्षापासून आपच्या माध्यमातून कार्य करत आहे. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.


ॲड. महेश शिंदे म्हणाले की, दिल्ली, पंजाब राज्यात आपने सर्वसामान्यांना मुलभूत सोयी-सुविधा निर्माण करुन दिल्या आहेत. महाराष्ट्रात देखील आपचे जोमाने कार्य सुरु असून, अहमदनगर जिल्ह्यात देखील परिवर्तन घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. अशोक डोंगरे यांनी सुदृढ लोकशाहीसाठी कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान प्रक्रिया पार पाडली पाहिजे. सध्या राज्यात सर्वच पक्षात फोडाफोडीचे राजकारण सुरू असून, यामुळे सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटू शकत नाही. नागरिकांना आपकडून मोठ्या अपेक्षा असून, मोठ्या संख्येने नागरिक स्वतःहून पक्षात सहभागी होत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटन चांगल्या पद्धतीने सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या निवडीबद्दल पोपटराव बनकर, रावसाहेब काळे, विनोद साळवे, राजेंद्र कर्डिले, भरत खाकाळ, रवी सातपुते, विद्या शिंदे, रजनी ताठे, साक्षी जाधव, सचिन एकाडे, तान्हाजी कांबळे, गणेश मारवाडे, विक्रम क्षीरसागर, तुकाराम बेल्हेकर, दिलीप घुले, काकासाहेब खेसे, रोहित गांधी, प्रज्वल डोंगरे, किशोर ढगे, भाऊसाहेब जाधव, वैभव कांबळे, राहुल शिवशरण, सचिन पवार, शेखर पुजारी, सुमेध क्षीरसागर, निर्मला कळमकर, संगीता पठारे, प्रकाश खंडागळे, एकनाथ डोंगरे, भाग्यश्री काळे, प्रकाश वडवणीकर, तनीज शेख आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *