शाळेला विद्यार्थ्यांकडून महापुरुषांच्या प्रतिमा भेट
सचोटी, ध्येय व सातत्य या त्रिसूत्रीच्या जोरावर जीवनात उत्तुंग ध्येय गाठता येणार -डॉ. पारस कोठारी
अहमदनगर (प्रतिनिधी)- सचोटी, ध्येय व सातत्य या त्रिसूत्रीच्या जोरावर जीवनात उत्तुंग ध्येय गाठता येणार आहे. यश ही साधना, जिद्दी व चिकाटीचा तपस्या असते. जीवनात मोठे ध्येय ठेवून त्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे. नाईट स्कूलच्या माध्यमातून कष्टकरी मुले परिश्रमाने पुढे जात असून, या मुलांचा संस्थेला अभिमान असल्याचे प्रतिपादन भाई सथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांनी केले.
भाई सथ्था नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता दहावी व बारावी बोर्डातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभात भावी जीवनासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. कोठारी बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक मिलिंद गंधे, शाळेचे माजी विद्यार्थी तथा एका नामांकित कंपनीचे मॅनेजर किशोर सम्रपवार, रात्रशाळेचे प्राचार्य सुनिल सुसरे आदींसह विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.
मिलिंद गंधे म्हणाले की, यश अपयश हे आपल्या हातात आहे. यशाचे गमक मोठे नसून, लक्ष केंद्रित करुन प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते. काम करून शिकणारे विद्यार्थी स्वत:च्या हिमतीवर पुढे जात असल्याचा अभिमान आहे. चांगल्या लोकांचा सहवास आयुष्यात परिवर्तन घडवतो. सर्वांच्या आयुष्यात यश, अपयश संकट येतात. डगमगून न जाता सामोरे जाण्याचे त्यांनी सांगितले.

किशोर सम्रपवार यांनी कामाची लाज बाळगू नका. रात्र प्रशाळेत सर्व जीवनाचा सार शिकवला जातो. रात्रशाळेचे शिक्षक हे आधारवड असून, त्यांची पूजा करा. अपयश पाचवीला पुजलेले असले तरी त्यावर मात करून खचून न जाता जिद्दीच्या जोरावर पुढे जाण्याचे त्यांनी आवाहन केले. तर जीवनात समाधानी राहायचे शिका, हव्यासाने आयुष्याचे वाटोळे होते. कौशल्य आत्मसात करा यश नक्की मिळणार असल्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
प्रारंभी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक महादेव राऊत यांनी केले. प्राचार्य सुनिल सुसरे यांनी मासुम संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाणार असल्याचे जाहीर केले. रात्रशाळेच्या पुनम बारगळ, बबीता साळवे, भावना गर्गे, स्वाती भगत, दत्तात्रय गायकवाड, तनिष्का भोसले विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत मध्ये या शाळेत जीवनात लढायला व घडायला शिकायला मिळाल्याचे सांगून, शाळा व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी शाळेला महापुरुषांच्या प्रतिमा भेट दिल्या. यावेळी शाळेचे शिक्षक गजेंद्र गाडगीळ, महादेव राऊत, उज्वला साठे, वैशाली दुराफे, अमोल कदम, वृषाली साताळकर शिवप्रसाद शिंदे, बाळू गोर्डे, संदेश पिपाडा, शरद पवार, मंगेश भुते, कैलास करांडे, प्रशांत शिंदे, अशोक शिंदे, स्वाती होले, ओंकार भिंगारदिवे, अनिरुद्ध देशमुख, अनिरुद्ध कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, अविनाश गवळी, मनोज कोंडेजकर, कैलास बालटे यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक अंबादास जावळे, सरस्वती भगत, ललिता गवारे, गणेशराव यांचा सत्कार करण्यात आला.हिं.सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.मोडकसर, सचिव,संजय जोशी,कार्याध्यक्ष ॲड.फडणीस, जेष्ठ मार्गदर्शक ब्रिजलालजी सारडा, श्री. अजितजी बोरा यांनी सुध्दा विद्यार्थ्यांना शुभकामना दिल्या,सुत्रसंचालन कु माया पाटोळे व तनिष्का भोसले यांनी केले. आभार पुनम वाघिरे यांनी मानले.