• Mon. Jul 21st, 2025

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशचे पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण

ByMirror

Feb 5, 2024

मागासवर्गीय महिलेचे दुकान जेसीबीने पाडणाऱ्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- जागा विकत देण्यास नकार दिल्याने जेसीबीने चप्पलचे दुकान पाडणाऱ्या जातीयवादी प्रवृत्तीच्या गुंडांवर अनूसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशचे राज्य उपाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण केले. यामध्ये जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे, महिला जिल्हाध्यक्षा अलकाताई झरेकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला प्रदेशाध्यक्ष शोभाताई कानडे, एकनाथ राऊत, महेश आहेर, बाबासाहेब महापुरे, बाबासाहेब डोळस सहभागी झाले होते.


रघुनाथ आंबेडकर यांची पत्नी शांताबाई आंबेडकर यांचे भाळवणी येथे राहत असलेल्या ठिकाणी स्वत:च्या मालकीचे चप्पलचे दुकान आहे. घरा शेजारी राहणारे व मुंबई येथे मत्स्य व्यावसाय करणाऱ्या व्यक्तीने सदर जागा विकत मागितली होती. परंतु आंबेडकर दांम्पत्यांनी सदर जागा विकण्यास नकार दिला.

याचा राग येऊन त्यांनी काही जातीयवादी प्रवृत्तीच्या गुंडांना हाताशी धरुन जातीवाचक शिवीगाळ करुन सदरची चप्पलची दुकान जेसीबीद्वारे पाडण्यात आली. पारनेर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार करुन देखील संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली नसून, याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


सदर मत्स्य व्यावसायिक मुंबईला बसून सर्व सूत्र हलवित असून, मागासवर्गीय कुटुंबातील महिलेचे दुकान जेसीबीद्वारे पाडण्यात आले. सदर व्यक्तींमुळे कुटुंबीयांमध्ये दहशत पसरली असताना सदर प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला तो मत्स्य व्यावसायिक व त्याच्या सांगण्यावरुन दुकान पाडणारे गुंडांवर अनूसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करावा व गुंडांपासून संरक्षणाच्या दृष्टीकोनाने कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *