• Sun. Jul 20th, 2025

खून झालेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची रिपाईचे जिल्हाध्यक्षांनी घेतली भेट

ByMirror

Feb 4, 2024

केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले सांत्वन; तर कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे दिले आश्‍वासन

अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन खून झालेल्या पिडीत कुटुंबियांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. याबाबत सर्व माहिती केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांना कळविण्यात आली. ना. आठवले यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कुटुंबाला मदत उपलब्ध करुन लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.


मयत झालेल्या मुलीला वडिल नसून, ती लहान भाऊ व आई सोबत राहत होती. या प्रकरणाने पिडीत कुटुंबियांवर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. कुटुंबाला आर्थिक आधार व पोलीस संरक्षण मिळण्याची गरज असल्याची भावना साळवे यांनी व्यक्त केली. तर जिल्हा पोलीस अधीक्षकांशी भेटून या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शासन होण्यासाठी योग्य दिशेने तपास व्हावा व कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी अविनाश भोसले, तालुकाध्यक्ष किरण दाभाडे, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, शिवाजीराव साळवे, तालुका उपाध्यक्ष जयराम आंग्रे, सतीश नाना साळवे, शिवाजी शिरोळे, ग्रामपंचायत सदस्य मेघनाथ धनवटे, यश रोकडे, सुजित शिंदे, ईश्‍वर शिंदे, शुभम पुंड, नीरज जेठे, प्रल्हाद कुसळकर, संकेत गायकवाड, अमोल शिंदे आदींसह गावातील रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *