• Mon. Jul 21st, 2025

ब्रायडल टॅलेंट शो मध्ये युवती अवतरल्या वधूंच्या वेशभुषेत

ByMirror

Feb 2, 2024

युवतींना अद्यावत मेकअपचे धडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या ब्रायडल टॅलेंट शो मध्ये युवतींनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. विविध पारंपारिक वधूंच्या वेशभुषेत अवतरलेल्या युवतींनी सर्वांचे लक्ष वेधले. तर युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने मेकअप सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.


अहिल्या फाउंडेशन, अहिल्या मेकओव्हर ॲण्ड अलकाज ब्युटी प्लॅनेटच्या संयुक्त विद्यमाने माऊली सभागृहात हा कार्यक्रम रंगला होता. या टॅलेंट शोमध्ये मेकअप आर्टिस्ट यांनी आपल्या मॉडेल्सना वधूंच्या पारंपारिक वेशभुषेत सजविल्या होत्या. वधूंच्या वेशभुषेत वधूंनी रॅम्प वॉक करून विविध कलागुण सादर केले. नृत्य, अभिनयासह विविध कलेचे सादरीकरण केले. यामध्ये दोनशेपेक्षा जास्त युवती व महिलांनी सहभाग नोंदवला.


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या असलेल्या इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट अलका गोविंद यांनी महिलांचे सौंदर्य खुलविण्यासाठी अद्यावत तंत्रज्ञान व सौंदर्य प्रसाधनावर उपस्थित महिला व युवतींना मार्गदर्शन करुन दोन ब्रायडल लूक करून दाखविले. तर समोरच्या व्यक्तीचे सौंदर्य खुलविण्यासाठी मेकअप आर्टिसला परिपूर्ण ज्ञान असणे आवश्‍यक आहे. यासाठी प्रशिक्षणातून नवनवीन कौशल्य आत्मसात करण्याची गरज निर्माण झालेली आहे. सध्या फॅशनचे युग असून मेकअप आर्टिस्टला चांगली मागणी आहे. युवतींना करिअरच्या दृष्टीकोनाने या क्षेत्रात उत्तम संधी असल्याचे त्यांनी सांगितले.


इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट कावेरी कैदके व राज गोविंद  यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या मेकअप सेमिनारमध्ये सिग्नेचर ब्रायडल लुक, वॉटरप्रूफ मेकअप, इंटरनॅशनल आय मेकअप व इंटरनॅशनल हेअर स्टाईलचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *