बबन म्हेत्रे यांची अध्यक्षपदी निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव प्रेस क्लबची नुतन कार्यकरणी जाहीर नुकतीच जाहीर करण्यात आली. माजी अध्यक्ष समीर मन्यार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
या बैठकीत नुतन अध्यक्षपदी बबन म्हेत्रे, उपाध्यक्षपदी संजय गाडीळकर, सचिवपदी विक्रम लोखंडे, खजिनदारपदी योगेश गुंड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच केडगाव प्रेस क्लबच्या प्रसिद्धी प्रमुखपदी गोवर्धन पांडुळे, सल्लागारपदी भूषण देशमुख, रविंद्र देशपांडे, नितीन देशमुख, समीर मन्यार यांची निवड करण्यात आली. यावेळी केडगाव प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.