अहमदनगर (प्रतिनिधी)- भूसंपादनाच्या रकमेवरुन नातेवाईकानी वाद केल्याने भूसंपादनाची सर्व रक्कम न्यायालयात वर्ग झाली. तसेच नातेवाईकांनी मारहाण केली. या बाबत गोरक्षनाथ सुराळे यांनी सुरु केलेले उपोषण प्रशासनाने दिलेल्या ठोस कारवाईच्या आश्वासनानंतर सुटले.
या बाबतची माहिती अशी मारहाण केलेल्या नातेवाईकांवर शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा व कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे या मागणीसाठी गोरक्षनाथ पुंजाहरी सुरळे यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या वेळी गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप गोरक्षनाथ सुरळे यांनी केला आहे.
भूसंपादनाचे रकमेवरुन नातेवाईकांनी वाद घातल्यामुळे उप विभागीय अधिकारी, शिर्डी यांनी भूसंपादनाची सर्व रक्कम कोपरगाव न्यायालयात वर्ग केली गेली. नातेवाईक त्यांचे अनोळखी मित्र यांनी मारहाण केली आहे. तसेच न्यायालयात गेल्यास तुला गाडीखाली घालून मारु, अशी जिवे मारण्याची धमकी दिली. पैशांची मागणी केलेली आहे. आदी मागण्यासाठी गोरक्षनाथ सुरळे व त्यांच्या कुटुंबीयांनी उपोषण सुरु केले होते.
याप्रकरणी संबंधितांवर ठोस कारवाई करून असे प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर गोरक्षनाथ सुर्वे यांचे उपोषण सुटले. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते सुरळे यांनी उपोषण सोडले. यावेळी उत्तर महाराष्ट्र उद्योग आघाडी (भाजपा) सरचिटणीस अशोक लोंढे, ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते किशोर विष्णुपंत उंडे आदी उपस्थित होते.