पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा शिबिराला उत्स्फूर्त
होमिओपॅथी शास्त्रोक्त औषधप्रणालीद्वारे जुनाट व्याधीतून कायमस्वरूपी बरे होतात -डॉ. प्रमोद लंके
अहमदनगर (प्रतिनिधी)- दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांसाठी भोरवाडी (ता. नगर) येथे मोफत होमिओपॅथिक उपचार शिबिर पार पडले. यशोदा लंके फाउंडेशन, गुरुसाई फाउंडेशन व होलीस्टिक क्लासिकल होमिओपॅथिक क्लिनिक ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या शिबिरात पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन बाबासाहेब भोर गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यशोदा लंके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद लंके, यशोदा लंके फाउंडेशनचे कोषाध्यक्ष शिवाजी लंके, ग्रामपंचायत सदस्य राहुल जाधव, सामाजिक कार्यकर्ते योगेश पानसरे, सचिव रक्षा लंके, सहसचिव रंजन इनमुलवार विकास अरुण, श्रद्धा जेटला आदी उपस्थित होते.

डॉ. प्रमोद लंके म्हणाले की, जुनाट व दुर्धर व्याधींनी बहुतांशी लोक ग्रासलेले असून, अनेक वर्षांपासून उपचार घेऊनही फायदा होत नाही. होमिओपॅथी ही एक सक्षम व शास्त्रोक्त औषधप्रणालीद्वारे अशा रुग्णांना जुनाट व्याधीतून कायमस्वरूपी बरे करता येणे शक्य आहे. अशा रुग्णांना होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा पुरेपूर फायदा घेता यावा व होमिओपॅथी या शास्राचा अधिकाधिक प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. होमीओपॅथीने अनेक जुनाट व दुर्धर आजार बरे करता येतात. फक्त या पॅथीत योग्य पद्धतीने उपचार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती नाही अशा रुग्णांना शिबिराच्या माध्यमातून आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचेही डॉ. लंके यांनी सांगितले.
या शिबिरात दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना मोफत औषधोपचार देण्यात आले. या शिबिरांतर्गत रुग्णांना मोफत औषधोपचार करून त्यांना पुढील औषधोपचारासाठीही योग्य मार्गदर्शनाची हमी शिबिराद्वारे देण्यात आली. या शिबिरात सुमारे दोनशेपेक्षा जास्त ग्रामस्थांची तपासणी करुन त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. गरजूंवर यापुढेही मोफत औषधोपचार करण्याचे यावेळी डॉ. लंके यांनी जाहीर केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी ऋषिकेश खैरे, प्रतीक जाधव, विजय लोमटे, प्रदीप झरेकर, प्रवीण भोर, सुरेश भोर, भरत खैरे, बाबा टांगळ यांचे सहकार्य लाभले.
