जय श्रीराम…, सियावर रामचंद्र की जय…. च्या घोषणांनी परिसर दणाणला
नागरिकांना साखर व डाळ वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर-कल्याण रोड येथील जाधव मळा येथे प्रभाग क्र. 8 मध्ये नागरिकांना खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते अयोध्या येथील राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त साखर व दाळचे वाटप करण्यात आले. तर 52 लाखाच्या विविध विकासकामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला.

यावेळी नगरसेवक सुभाष लोंढे, युवासेनेचे शहर जिल्हाध्यक्ष पै. महेश लोंढे, भाजपच्या शहर जिल्हा सरचिटणीस सविता कोटा, भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर, ॲड. युवराज शिंदे, ओंकार लेंडकर, योगेश सोनवणे, भैय्या जाधव आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर फुलांचा वर्षाव करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. खासदार विखे यांनी अयोध्या येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेने भारतभर दिवाळी साजरी होत आहे. या आनंदमय सोहळ्यात सर्वांना सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले. तर राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने विकासात्मक बदल दिसत असल्याचे स्पष्ट केले.

मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी जय श्रीराम…, सियावर रामचंद्र की जय…. चा यावेळी गजर केला.
