• Thu. Jan 1st, 2026

जिल्हा न्यायालयात रंगला महिला वकील व महिला न्यायाधीशांचा हळदी-कुंकूचा कार्यक्रम

ByMirror

Jan 21, 2024

महिलांना संविधानाच्या प्रती व कापडी पिशव्यांचे वाण

महिलांची आता बडीसी आशा बडीसी दुनिया! – जिल्हा न्यायाधीश एम.ए. बरालीया

अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांची छोटीशी आशा, छोटीशी दुनिया नसून आता बडीसी आशा बडीसी दुनिया! झाली आहे. चौकटी बाहेर पडून महिला आपले कर्तृत्व सिद्ध करत असून, त्यांच्या कक्षा देखील रुंदावल्या आहेत. बार आणि बेंच जवळ आले असून, हळदी-कुंकूच्या कार्यक्रमातून आणखी जवळीक वाढवून विचारांची देवाण-घेवाण होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश एम.ए. बरालीया यांनी केले.


अहमदनगर जिल्हा न्यायालयात महिला वकील व महिला न्यायाधीश यांचा संयुक्त हळदी-कुंकूचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बरालीया बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश एस.व्ही. सहारे, एम.एच. मोरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश भाग्यश्री पाटील, दिवाणी न्यायाधीश वाय.एम. तिवारी, एम.ए. देशमुख, एस.जी. अग्रवाल, एच.आर. जाधव, टी.एम. निराळी, ए.ए. जी.एम. शेख. बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा एस.एम. तामगाडगे, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व्ही.व्ही. सुपेकर, ए.बी. पाटील, पी.डी. यवतकर, एम.एस. कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
पुढे बरालीया म्हणाल्या की, चार भिंतीच्या पलीकडे जाऊन समाजात मिसळून कार्य करणे अवघड काम आहे. मोठ्या धाडसाने घरा बाहेर पडून समाजकार्य करणाऱ्या महिलांचा या कार्यक्रमात झालेला सन्मान कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


या हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात वाण म्हणून संविधानाच्या प्रती व कापडी पिशव्या देऊन प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला. तर जिल्हा क्रीडा कार्यालय व नेहरु युवा केंद्रातंर्गत सुरु असलेल्या राष्ट्रीय युवा सप्ताहाचा समारोप करण्यात आला. बारा ते तेरा वर्षापासून सातत्याने खेडोपाडी फिरून गरजू महिलांना शिवणकला, पार्लरचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्याचे कार्य करणाऱ्या जय युवा अकॅडमीच्या सचिव तथा महाराष्ट्र राज्य आदर्श युवती पुरस्कार विजेत्या जयश्री शिंदे व गेल्या चाळीस वर्षांपासून गरजू घटकातील महिलांना पार्लरचे मोफत प्रशिक्षण देणाऱ्या आणि अनाथ मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्विकारणाऱ्या विद्या सोनवणे यांचा न्यायाधीश बरालीया यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.


न्यायाधीश भाग्यश्री पाटील म्हणाल्या की, फुल उमलताना काटेरी प्रवास असतो. अशाच पद्धतीने महिलांचे जीवन असून, जीवनातील अनेक दुःख, वेदना बाजूला ठेवून ते आपले कर्तव्य हसत खेळत पार पाडतात. महिला वकील मोठ्या उमेदीने काम करुन जिजाऊंचा वारसा पुढे चालवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या कार्यक्रमासाठी वकील संघाचे महिला सचिव ॲड. भक्ती शिरसाठ, कार्यकारणी सदस्या ॲड. अस्मिता उदावंत, ॲड. वृषाली तांदळे, ॲड. अनिता दिघे, ॲड. आशा गोंधळे, ॲड. प्रज्ञा उजागिरे, ॲड. सुचिता कुलकर्णी, ॲड. स्वाती वाघ, ॲड. निर्मला चौधरी, ॲड. मीना शुक्रे, ॲड. सुजाता कुमार, ॲड. भावना पळिकुंटवार, ॲड. करुणा शिंदे, ॲड. बेबी बोर्डे, ॲड. दिपाली झांबरे, ॲड. मनीषा केळगंद्रे, ॲड. माधुरी वाघमारे, ॲड. लता गांधी, ॲड. अरुणा राशिनकर, ॲड. स्नेहल गायकवाड, ॲड. ज्योती हिमते, ॲड. रुबीना पठाण, ॲड. रुबीना जहागीरदार, ॲड. दीक्षा बनसोडे, ॲड. झरीन पठाण, ॲड. विमल खेडकर, ॲड. निरुपमा काकडे, ॲड. निशिता देशमुख, ॲड. मनीषा पंडुरे, ॲड. मनीषा खरात, ॲड. कुंदा दांगट, ॲड. रत्ना विंचुरकर, ॲड. रूपाली पाठारे आदींसह महिला वकील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विद्या सोनवणे यांनी संविधानाच्या प्रती तर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने कापडी पिशव्या उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. वृषाली तांदळे यांनी केले. आभार ॲड. अनिता दिघे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *