निमगाव वाघात राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत काव्य संमेलन उत्साहात; कवींनी सामाजिक वास्तवतेचे मांडल्या व्यथा
काव्य संमेलनातून सांस्कृतिक, साहित्य व सामाजिक चळवळीला दिशा मिळणार -आ. निलेश लंके
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त तिसरे राज्यस्तरीय काव्य संमेलन उत्साहात पार पडले. कवितेतून सामाजिक वास्तवतेचे दर्शन घडवून कवींनी सामाजिक व्यथा मांडल्या. आईच्या वात्सल्यावर सादरीकरण झालेल्या कवितेने ह्रदयाचा ठाव घेतला. तर महिला सशक्तीकरण, महिलांवर होणारे अत्याचार, आर्थिक विषमता, शेतकऱ्यांचा व्यथा, राजकारण, स्त्री जाणीवा व देशभक्तीवर एकापेक्षा एक सरस सादरीकरण झालेल्या कवितांना उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील ज्येष्ठ कवींसह नवोदित कवींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तर युवक-युवतींनी देखील आपल्या काव्यांचे सादरीकरण केले.

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. काव्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्य संमेलनासाठी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, कवयित्री लिला गोविलकर, संमेलनाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब शहाणे, अनिताताई काळे, कार्यक्रमाचे संयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, साहेबराव बोडखे, सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग, डॉ. सुलभा पवार, साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे, सुभाष सोनवणे, कवयित्री प्रतिभा खैरनार, कवी सखाराम गिरे, डॉ. विजय जाधव, गुलाब कापसे, भागचंद जाधव, भाऊसाहेब ठाणगे, अनिल डोंगरे, शिवाजी होळकर, उद्योजक दिलावर शेख, अजय लामखडे, वसंत पवार, साहित्यिक रज्जाक शेख, गणेश भगत, जालिंदर बोरुडे, मिराबक्ष शेख, पै. बाळू भापकर, कवी दिलावर शेख, गिताराम नरवडे, आनंदा साळवे, ह.भ.प. निवृत्ती महाराज कानवडे, देवीदास बुधवंत आदींसह युवक-युवती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कवी संमेलनात ज्येष्ठ कवींसह नवोदित कवींनी विविध विषयांवर कवितांचे सादरीकरण केले. तर बाल कवींनी देखील आपल्या कवीता सांगितल्या. यावेळी शिवकालीन मर्दानी खेळाचे धाडसी प्रात्यक्षिक रंगले होते. प्रशिक्षक सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली युवक-युवतींनी लाठी-काठी, तलवार, दानपट्टाचे थरारक प्रात्यक्षिके सादर केली.
कवियत्री प्रतिभा खैरनार यांच्या पडसावल्या व कवी सखाराम गोरे लिखित पाझर मनातला या काव्य संग्रहाचे प्रकाशन झाले. उत्कृष्ट काव्य संग्रहाची निर्मिती केल्याबद्दल कवयित्री खैरनार यांना बहिणाबाई पुरस्कार तर कवी गोरे यांना ग.दी. माडगूळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे म्हणाले की, कवी, साहित्यिक समाजाची वास्तवता मांडून समाज जागृतीचे कार्य करत असतात. नवोदित कवींना व्यासपीठ निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने संस्थेच्या माध्यमातून काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार निलेश लंके म्हणाले की, सामाजिक चळवळीला दिशा देण्याचे काम डोंगरे संस्था करीत आहे. संस्थेच्या माध्यमातून कला, क्रीडा, शैक्षणिक कार्यासह ग्रामीण भागात साहित्य क्षेत्राला देखील चालना दिली जात आहे. नवोदित कवींना संधी देण्याचे काम करण्यात आले आहे. काव्य संमेलनातून सांस्कृतिक, साहित्य व सामाजिक चळवळीला दिशा मिळणार आहे.

कवी बाळासाहेब मुन्तोडे, अनिता काळे, गोविंद पाठक, शांता मरकड, सुरेखा घोलप, वैशाली कंकाळ, कल्पना निंबोकर व बालकवी दुर्गा कवडे, प्रांजली वीरकर, के.बी. शेख, आर्यन संत, प्रबोधिनी पठाडे, प्रज्वल थोरवे, साईराज नागरे, देविदास बुधवंत यांनी सामाजिक विषयांवर कविता सादर केल्या. निष्ठा सुपेकर व आभास सुपेकर या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. बालशाहीर ओवी प्रसाद काळे हिने पोवाडे गायले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रज्जाक शेख यांनी केले. आभार संदिप डोंगरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मयुर काळे, अभिजीत पाचारणे, राधिका डोंगरे, ज्योती डोंगरे, मंगल ठाणगे, सोनाली फलके, दिपाली फलके, प्रियंका डोंगरे-ठाणगे, कोमल ठाणगे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात व जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांचे मार्गदर्शन लाभले.
