• Tue. Jul 22nd, 2025

मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडून जालिंदर बोरुडे यांच्या कार्याचे कौतुक

ByMirror

Jan 17, 2024

विक्रमी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्याबद्दल सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील 3 लाख 1 हजार 111 नागरिकांवर विक्रमी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणणारे नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांच्या निस्वार्थ सामाजिक कार्याचे कौतुक करुन मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी बोरुडे यांचा सत्कार केला. यावेळी उद्योजक मितेश शहा, जिल्हा परिषदचे संजय शिंदे, उद्योजक सोमनाथ जाधव, ॲड.सी.डी. मोहिते आदी उपस्थित होते.


एका कार्यक्रमानिमित्त शहरात आलेले मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाचे चिवटे यांनी बोरुडे यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली. तर समाजातील गरजू घटकांना आरोग्य सेवेतून नवदृष्टी देण्याचे बोरुडे यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट करुन या समाजोपयोगी कार्याला शासनाच्या माध्यमातून हातभार लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे संगितले.

बोरुडे यांनी गेल्या 31 वर्षापासून फिनिक्स सोशल फाऊंडेशन व इतर सामाजिक संघटनांच्या माध्यमातून शिबिर घेऊन हजारो गोरगरीब नेत्रदोष असलेल्या रुग्णांना मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणण्यात आल्या आहेत. या सेवेच्या माध्यमातून त्यांनी दृष्टी दोष असलेल्यांना नवीन दृष्टी देण्याचे सेवा कार्य केले आहे. त्याचबरोबर नेत्रदान व अवयवदान चळवळीत सुरु असलेल्या कार्याची त्यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *