निलेश लंके प्रतिष्ठान अविनाश साठे सर मित्र परिवाराचा उपक्रम
महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा विद्यार्थ्यांना ज्ञात होण्यासाठी किल्ले बनवा स्पर्धा प्रेरणादायी -आ. निलेश लंके
अहमदनगर (प्रतिनिधी)- नव्यापिढीला गड-किल्ल्यांची तर विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या थोर पराक्रमाची माहिती मिळण्यासाठी निलेश लंके प्रतिष्ठान अविनाश साठे सर मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार निलेश लंके यांच्या हस्ते झाले.
मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास व वैभव ज्ञात होण्यासाठी या स्पर्धेचे हे दुसरे पर्व होते. आमदार लंके यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना सायकल व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी भोयरे पठार व भोयरे खुर्द गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य त्याचप्रमाणे आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी, पालक व मित्र परिवार मोठ्या संख्यने उपस्थित होते.
अविनाश साठे हे सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक- शिवराज रावसाहेब देवकर, द्वितीय क्रमांक- रागिनी गोरख उमाप, तृतीय क्रमांक- ध्रुव मुठे, रुद्र मुठे यांना, चतुर्थ क्रमांक- सोहंम सुखदेव मुठे, पाचवा क्रमांक- स्वराजराजे जमदाडे, सहावा क्रमांक- अभिलाशा साठे, सातवा क्रमांक- प्रताप खंडागळे यांनी पटकावला.
आमदार निलेश लंके यांनी महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा विद्यार्थ्यांना ज्ञात होण्यासाठी किल्ले बनवा स्पर्धा प्रेरणादायी उपक्रम आहे. विद्यार्थ्यांसाठी अविनाश साठे राबवित असलेल्या उपक्रमाचे कौतुक करुन, त्यांनी विजेत्या मुलांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी केले. आभार अमोल बोठे यांनी मानले.