अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त मोठा उत्साह पहायला मिळाला. यावेळी बाबासाहेबांच्या मार्केटयार्ड चौकातील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी भिम अनुयायींची मोठी गर्दी जमली होती. तसेच चौका-चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याभोवती आकर्षक सजावट करुन अभिवादन करण्यात आले.
सकाळी मार्केटयार्ड चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर भिमवंदना होऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार संग्राम जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त शंकर गोरे आदींसह विविध राजकीय, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, भिम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी विविध वेशभुषेत चिमुकले अभिवादनासाठी आले होते.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त इंपिरियल चौक माळीवाडा येथे अरुण काका मित्र मंडळ, पै.अफजल भाई फ्रेंड सर्कल, एकता मित्र मंडळ व संकल्प युवा प्रतिष्ठान च्या वतीने बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आमदार संग्राम जगताप समवेत उद्योजक पै.अफजल शेख, अशोक गायकवाड, सुनील कोतकर, परिमल निकम, पै. असलम शेख, सुरेश बनसोडे, पै गणेश साळवे, योगेश थोरात, निखिल शिंदे, सोहेल शेख, वाहिद कुरेशी, परवेज शेख, आकाश औटी, वाहिद शेख, आकाश शिरसाट, शुभम साळवे, विकी थोरात, किरण चंदनशिव, फरान शेख, वसीम शेख, नीलू शेत्रे, जय शिंदे, सागर ठोकळ, शुभम बडेकर, अजर शेख आदी उपस्थित होते.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त इंपिरियल चौक माळीवाडा येथे अरुण काका मित्र मंडळ, पै.अफजल भाई फ्रेंड सर्कल, एकता मित्र मंडळ व संकल्प युवा प्रतिष्ठान च्या वतीने सरबत वाटप करताना आमदार संग्राम जगताप समवेत उद्योजक पै.अफजल शेख, अशोक गायकवाड, सुनील कोतकर, परिमल निकम, पै. असलम शेख, सुरेश बनसोडे, पै गणेश साळवे, योगेश थोरात, निखिल शिंदे, सोहेल शेख, फिरोज कुरेशी, परवेज शेख, आकाश औटी, वाहिद शेख, आकाश शिरसाट, शुभम साळवे, विकी थोरात, किरण चंदनशिव, फरान शेख, वसीम शेख, नीलू शेत्रे, जय शिंदे, सागर ठोकळ, शुभम बडेकर, अजर शेख आदी उपस्थित होते.