शिक्षणाबरोबरच संस्कार देणारे ज्ञानमंदिराची गरज -राजेंद्र शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था केडगाव संचलित ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. सांस्कृतिक कार्यक्रमातून लेक वाचवा लेक शिकवाचा संदेश देऊन स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. रंगलेल्या कार्यक्रमात स्त्री शक्तीचे विविध रुप दाखविण्यात आले.
ज्ञानेश्वरी लॉन्स येथे झालेल्या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक राजेंद्र शिंदे उपस्थित होते. विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, समाजाला शिक्षणाबरोबरच संस्कार देणारे ज्ञानमंदिराची गरज निर्माण झाली आहे. सध्याच्या काळात मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार देणे खूप आवश्यक असून, त्या दृष्टीने ज्ञानसाधना गुरुकुलचे कार्य सुरु आहे.

शिक्षकांबरोबरच पालकांनी देखील आपल्या मुलांकडे लक्ष दिल्यास भावी पिढीचे भवितव्य उज्वल राहणार असल्याचे सांगितले. त्यांनी आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाऊन शिक्षण घेऊन सुरु केलेली स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी व एक यशस्वी उद्योजक होण्यापर्यंत प्रेरणादायी जीवनप्रवास विद्यार्थ्यांना सांगितला. तर ज्ञानसाधनाच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

डॉ. शरद मोहरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक मनोज कोतकर, सुमन कुरेल, संभाजी पवार, उद्योजक जालिंदर कोतकर, बच्चन कोतकर, मधुकर चिपाडे, संग्राम कोतकर, भैरू कोतकर, अजित कोतकर, रुपेश गायकवाड, सुमित लोंढे, बाळासाहेब रणे, संस्थेचे अध्यक्ष दीपक तागडे, सचिव संदीप भोर, मुख्याध्यपिका रुचिता जमदाडे, शबाना शेख, शाहरुख शेख आदींसह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.