• Fri. Jul 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

दहिवाळ सराफच्या बक्षिसांची लयलूट ऑफरची सोडत जाहीर

ByMirror

Dec 22, 2023

सुनिता आढाव ठरल्या मोपेड बाईकच्या विजेत्या

21 भाग्यवान विजेत्यांना सोन्याची नथ व पैठणी साडीचे बक्षिस

अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर एमआयडीसी येथील दहिवाळ सराफ खरवंडीकर दालनात दिवाळी व पाडव्यानिमित्त ग्राहकांसाठी बक्षिसांची लयलूट ऑफर ठेवण्यात आली होती. या योजनेनिमित्त सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या कुपनची सोडत काढण्यात आली. यामध्ये भाग्यवान विजेत्या सुनिता आढाव मोपेड बाईकचे भाग्यवान विजेत्या ठरल्या आहे. तर सोडत मधील 21 भाग्यवान विजेत्यांना सोन्याची नथ व पैठणी साडीचे बक्षिस देण्यात आले.


दिवाळी व पाडव्यानिमित्त दहिवाळ सराफ खरवंडीकर दालनात पाच हजार रुपये पुढील खरेदीवर ग्राहकांना लकी ड्रॉ कुपन देण्यात आले होते. या जमा झालेल्या कुपनची सोडत नुकतीच काढून भाग्यवान विजेत्यांना बक्षिसं देण्यात आली. दहिवाळ सराफचे संचालक नवनाथभाऊ दहिवाळ, सचिन दहिवाळ व नितीन दहिवाळ यांच्या हस्ते ही बक्षिसं देण्यात आली. यावेळी हरिभक्त परायण जनार्धन महाराज माळवदे, गणेश काळे, कचरू ढगे, किरण साळवे, सचिन भदर्गे, विठ्ठल पुरी, पूजा काळे, अरुणा दहिवाळ, पूजा दहिवाळ, अनुष्का मैड, शंभू दहिवाळ, साईराज दहिवाळ, ओवी दहिवाळ, देवांश दहिवाळ, स्वरा दहिवाळ, मंगेश शहाणे, सचिन दहिवाळ, शितल दहिवाळ, राम डहाळे, शुभम सिंग, प्रिया मद्दा, स्नेहा झेंडे, गीता मॅडम, सीमा बडे, संतोषी भिसे, बंडू भिसे आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


दहिवाळ सराफ खरवंडीकर यांचे नवनागापूर (रेणुका स्कूल जवळ), पाईपलाईन रोड (यशोदा नगर कमानी समोर), खरवंडी (ता. पाथर्डी) व धनकवडी (जि. पुणे) येथे चार शाखा कार्यरत आहे. या चारही शाखेमध्ये महिला दिन व विविध सण-उत्सव काळात खरेदीवर विविध ऑफर ठेवण्यात येते. तसेच इतर उपक्रम देखील राबवून सोन्या चांदीच्या खरेदीवर विविध भेटवस्तू दिल्या जातात. दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या दालनात सर्व प्रकारचे आकर्षक डिजाईनचे सोन्याचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, कास्टिंग ज्वेलरी, सर्व स्टोन ज्वेलरी, राशीचे खडे, हिऱ्यांचे दागिने उपलब्ध आहेत.

दागिन्यांच्या घडणवळणीवर सर्वात कमी मजुरी असलेले हे दालन असून, सर्व शाखांमध्ये हॉलमार्क प्रमाणे बिगर घटीचे दागिने उपलब्ध आहेत. 1978 पासून शाखा कार्यरत असून, ग्राहकांमध्ये एक विश्‍वास निर्माण करण्यात आला असल्याचे दहिवाळ बंधूंनी सांगितले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *