ट्रकसाठी खासगी फायनान्स कंपनीकडून घेतले होते कर्ज
अहमदनगर (प्रतिनिधी)- ट्रक घेण्यासाठी घेतलेल्या कर्ज प्रकरणी देय रक्कम अदा करण्यासाठी फायनान्स कंपनीला 7 लाख 60 हजार चा दिलेल्या धनादेश बाऊन्स प्रकरणी आरोपातून इसाक पठाण यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
इसाक सिकंदर पठाण (रा. वडगाव गुप्ता) यांनी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड कंपनीकडून ट्रक घेण्यासाठी रक्कम 7 लाख 47 हजार रुपयेचे कर्ज घेतले होते. त्याच्याकडील देय रक्कम अदा करण्यासाठी, आरोपीने स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा एमआयडीसीचा 7 लाख 60 हजार रुपयाचा धनादेश जारी केला होता. जेव्हा सदर चे धनादेश (चेक) पेमेंटसाठी सादर केले गेले, तेव्हा ते 20 जून 2022 रोजी खाते बंद असल्याचे कारण देऊन अनादर करून परत करण्यात आले.
24 जून 2022 रोजी आरोपींना डिमांड नोटीस बजावण्यात आली. 01 जुलै 2022 रोजी, आरोपींना मागणी नोटीस मिळाली. तथापी तो मागणी सूचनेचे पालन करण्यात अयशस्वी ठरला. त्यामुळे तक्रारदाराकडून आरोपी विरुद्ध अतिरिक्त मुख्य न्यादंडाधिकारी (कोर्ट नंबर 19) डी.व्ही. कर्वे यांच्या न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट, 1881 चे कलम 138 अंतर्गत दंडनीय गुन्ह्यासाठी खटला दाखल करण्यात आला होता. सदर खटल्यात फिर्यादी कंपनी च्या वतीने एकूण 10 पुरावे सादर करण्यात आले होते. न्यायलयाने गुनदोषावर खटला चालवून चेकची रक्कम आरोपीने देय नाही तसेच फिर्यादी कंपनीच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधीला प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार नाही. असे निष्कर्ष काढून आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला सदर गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले आहे. सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड.हाजी रफिक निजामभाई बेग, ॲड. रियाज रफिक बेग व ॲड. अयाज रफिक बेग यांनी काम पाहिले.