• Mon. Jul 21st, 2025

रविवारी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर

ByMirror

Dec 1, 2023

पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची होणार आरोग्य तपासणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषद अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने 85 व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी (दि.3 डिसेंबर) शहरातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांच्या सूचनेनुसार हे शिबिर होणार आहे.


रविवारी सकाळी 10 वाजता या शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते व मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस मन्सूर शेख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत पत्रकारांची आरोग्य तपासणी, मधुमेह, उच्च रक्तदाब व नेत्र तपासणी करण्यात येणार आहे.


या शिबिरात डॉ. इमरान शेख, डॉ. विशाल कदम व डॉ. अरबाज शेख विविध तपासणी करणार आहेत. पत्रकारांना यावेळी मोफत नंबरचे चष्मे व गॉगलचे वाटपही केले जाणार आहे. शिबिर मराठी पत्रकार परिषद कार्यालय, झेंडिगेट, अहमदनगर येथे होणार असून, सर्व पत्रकारांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *