महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची योजना
योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे प्रहार अपंग क्रांती संघटनेचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही दिव्यांग वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे यांनी दिली.
दिव्यांगांसाठी ही योजना 3 डिसेंबर पासून ते 4 जानेवारी 2024 पर्यंत सकाळी 10 वाजेपर्यंत ऑनलाईन उपलब्ध असणार आहे. याकरिता दिव्यांगांना या https://evehicleform.mshfdc.co.in/ संकेतस्थळावर योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या दिव्यांग लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळणार असून, या योजनेच्या अधिक माहितीसाठी 918035742016 या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींनी सदर शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे, जिल्हा सचिव हमीद शेख, शहराध्यक्ष संदेश रपारिया, महिला जिल्हाध्यक्षा लक्ष्मीबाई देशमुख, पोपट शेळके, राजेंद्र पोकळे, किशोर सूर्यवंशी, काकासाहेब दसपुते, कांचन वखारीया, गितांजली कासार यांनी केले आहे.