• Fri. Sep 19th, 2025

शहरातील हुतात्मा स्मारकात 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली

ByMirror

Nov 27, 2023

भारत माता की जय…, वंदे मातरम…च्या घोषणांनी परिसर दणाणला

26-11 मधील शहिदांचे बलिदान भावी पिढीला देशकार्यासाठी स्फूर्ती देणारे -आ. संग्राम जगताप

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- 26-11 रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ल्याचा दिवस प्रत्येकाच्या मनात कोरला गेला आहे. हा काळा दिवस कोणीही विसरू शकत नाही. या हल्ल्यात स्वतःची व कुटुंबाची परवा न करता पोलीस अधिकारी, कर्मचारी व जवानांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बलिदान दिले, ही जाणीव प्रत्येकाने मनात बाळगावी. या हल्ल्यातील शहिदांचे बलिदान भावी पिढीला देशकार्यासाठी स्फूर्ती देणारे राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


26-11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवान व पोलीसांना लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, मराठी पत्रकार परिषद, लिओ क्लब ऑफ अहमदनगर, गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने हुतात्मा स्मारकात पुष्पचक्र वाहून व मेणबत्त्या प्रज्वलीत करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप बोलत होते. प्रारंभी छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आले. यावेळी पोलीस उपाधीक्षक (गृह विभाग) हरीश खेडकर, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, लायन्सचे अध्यक्ष धनंजय भंडारे, हरजितसिंह वधवा, प्रा. माणिक विधाते, लिओ क्लबच्या अध्यक्षा आंचल कंत्रोड, अशोक गायकवाड, पुरुषोत्तम झंवर, अभय मेस्त्री, कैलाश नवलानी, जस्मितसिंह वधवा, विजयसिंह होलम, सुर्यकांत नेटके, महेश पटारे, संदीप कुलकर्णी, रेश्‍मा आठरे, वैभव ढाकणे, गजेंद्र भांडवलकर, सुमित कुलकर्णी, जालिंदर बोरुडे, बाळासाहेब जगताप, परिमल निकम, यशवंत तोरडमल, शुभम पांडुळे, प्रशांत मुनोत, आशा पालवे, महादेव भद्रे, ज्योती मोकळ, किरन भंडारी, प्रणिता भंडारी, ओम भंडारी, प्रीत कंत्रोड, ऋषीकेश सुकाळे, विजय कुलकर्णी, आशा पालवे, साहेबराव काते, अनिल निकम, अलकनंदा पालवे, विजया सोनवणे, पूजा मोरे, महेश कांबळे, प्रदीप चन्ना आदींसह नागरिक व रयत शिक्षण संस्थेच्या जिजामाता कन्या निवास वसतीगृहाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


पुढे आमदार जगताप म्हणाले की, हा दहशतवादी हल्ला भारताच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला होता. भारतातील अर्थव्यवस्था कमकुवत करणे हा पाकिस्तानी अतिरेक्यांचा मुख्य उद्देश होता. भारतात आलेल्या परदेशी नागरिकांना त्यांनी टार्गेट केले होते. मात्र जिगरबाज पोलीस अधिकारी व जवानांनी प्राणाची आहुती देऊन हा भ्याड हल्ला परतून लावल्याचे त्यांनी सांगितले.


हुतात्मा स्मारकावर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन 26-11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थितांनी भारत माता की जय…, वंदे मातरम…च्या दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला. गौरी काळे या विद्यार्थिनीने देशभक्तीवर गीत सादर केले. यावेळी देशभक्तीने वातावरण प्रफुल्लीत झाले होते.


प्रास्ताविकात धनंजय भंडारे यांनी देशासाठी पोलीस व जवानांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव ठेऊन त्यांच्या त्यागातून प्रेरणा मिळण्यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले. पाहुण्यांचे स्वागत मन्सूर शेख यांनी केले. सूर्यकांत नेटके यांनी मराठी पत्रकार परिषद फक्त पत्रकारांसाठी कार्य न करता, समाजाच्या प्रश्‍नावर देखील कार्य करत असते. तर सामाजिक जाणीव ठेऊन विविध उपक्रम राबवित असल्याचे स्पष्ट केले.


हरीश खेडकर म्हणाले की, 26-11 दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राने कर्तबगार व जिगरबाज अधिकारी गमावले, हे नुकसान भरुन न निघणारे आहे. देशाच्या रक्षणासाठी या सर्वांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्याचे त्यांनी सांगितले. तर या दिवशी त्यांचे सहकारी राहिलेले पोलीस कर्मचारीने प्रत्यक्ष जिवंत अतिरेकी कशा पध्दतीने पकडला गेला याचे सांगितलेले अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरजितसिंह वधवा यांनी केले. आभार आंचल कंत्रोड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *