शिक्षण क्षेत्रात सुंबे यांचे कार्य दिशादर्शक -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रेसिडेन्शिअल विद्यालयाच्या उपमुख्याध्यापकपदी उपक्रमशील शिक्षक प्रा. रंगनाथ सुंबे यांची नियुक्ती झाल्याबद्दल स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे व सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सुंबे यांचा सत्कार केला. पै. नाना डोंगरे म्हणाले की, चास (ता. नगर) येथील श्री नृसिंह विद्यालयात रंगनाथ सुंबे यांनी उत्कृष्टपणे अध्यापनाचे कार्य केले. अनेक गुणवंत विद्यार्थी त्यांनी घडविले असून, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा त्यांचा हातखंडा आहे.
शिक्षण क्षेत्रात सुरु असलेले त्यांचे कार्य दिशादर्शक आहे. त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांची उपमुख्याध्यापकपदी झालेली निवड कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. विजय भालसिंग यांनी प्रा. सुंबे यांचे त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक मार्गदर्शक पुस्तकांची निर्मिती केली असून, त्यांच्या कार्यातून भावी पिढी घडणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.