वाडी-वस्तीवर पोहचली दाळ
सर्वसामान्यांना दिवाळी आनंदात साजरी करता येणार -रघुनाथ आंबेडकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्यांना दाळ स्वस्त दरात मिळावी म्हणून भाळवणी (ता. पारनेर) येथे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून नागरिकांना आधारकार्डवर 60 रुपये प्रति किलो दराने हरभरा दाळ वितरणाचा शुभारंभ करण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर व सरपंच लिलाबाई रोहोकले यांच्या हस्ते झाले. यावेळी बबनराव डावखर, डॉ. सुरेश शिंदे, डॉ. अभिजित रोहोकले, अरुण रोहोकले, संदीप कपाळे, अशोक लकडे, जगदीश आंबेडकर आदींसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
नाफेडच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्डच्या ओळखपत्रावर प्रति व्यक्ती पाच किलो दाळ उपलब्ध करून दिली आहे. यामुळे सर्वसामान्य माणसाला दिवाळी सण उत्साहात व आनंदात साजरा करता येणार आहे. गावा-गावातील वाडी-वस्तीवर प्रत्येकाला दाळ उपलब्ध करुन देण्यासाठी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सुवेंद्र गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील असल्याचे रघुनाथ आंबेडकर यांनी सांगितले.
सुवेंद्र गांधी यांनी दिवाळी सणानिमित्त मागेल त्याला दाळ उपलब्ध करुन दिली जात आहे. महागाईच्या काळात केंद्र व राज्य सरकार सर्वसामान्यांना आधार देत आहे. ही योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे भाजपचे कार्यकर्त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
