अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेच्या नुकतेच पार पाडलेल्या संचालक मंडळाच्या सभेत चेअरमनपदी नारायण कोडम व व्हाईस चेअरमनपदी सविता प्रकाश कोटा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी अल्ताफ शेख यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सभेत चेअरमन व व्हाईस चेअरमनपदासाठी अनुक्रमे कोडम आणि कोटा यांचे नाव सूचविण्यात आले. या दोघांच्या निवडीला सर्व संचालकांनी सहमती दर्शवली. दोन्ही पदाधिकारींच्या नियुक्तीची घोषणा शेख यांनी केली.
पतसंस्थेचे संस्थापक बालराज सामल (सर) यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन संचालक मंडळास संस्थेच्या माध्यमातून समाजाचा विकास साधण्यासाठीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे संचालक विनायक मच्चा, दत्तात्रय अंदे, अशोक शेराल, संजय चीप्पा, उमेश इराबत्तीन, गौतम भिंगरदिवे, गणेश वेदपाठक प्रमिला बिंगी, व्यवस्थापक आशिष बोगा आदींसह सर्व संचालक उपस्थित होते.
संस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या मुलांचे शिक्षण, व्यवसायासाठी तसेच होतकरु युवकांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर फक्त आर्थिक हित न पाहता समाजाच्या विकासाच्या दृष्टीकोनाने काम केले जाणार असल्याची भावना नवनिर्वाचित चेअरमन कोडम व व्हाईस चेअरमन कोटा यांनी व्यक्त केली. पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मधुकर लयचेट्टी, सुभाष कोडम, कल्पना अंदे, आरती एक्कलदेवी, वैष्णवी मंगलारम, प्रतिभा न्यालपेल्ली, प्रशांत रच्चा, भाग्येश कुरापत्ती, सुभद्रा आनंलदास आदी उपस्थित होते. नुतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.