राज्य सरकार समाजातील शेवटच्या घटकांचा विचार करुन त्यांना आधार देत आहे -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांची दिवाळी गोड होण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जाणारा आनंदाचा शिधा बालिकाश्रम रोड, सावेडी येथील स्वस्त धान्य दुकानात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते लाभार्थींना वाटप करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राजेंद्र चोपडा, अजय दिघे, रमेश सोनीमंडलेचा, ओबीसी सेलचे अमित खामकर, डॉक्टर सेलचे डॉ. रणजीत सत्रे, सामाजिक न्याय विभागाचे साधना बोरुडे, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, प्रा. भगवान काटे, निलेश इंगळे, लहू कराळे, किरण रोकडे, किरण पंधाडे, सुभाष बर्डे, अक्षय बोरुडे, सागर गुंजाळ, ऋषी ताठे, विक्रम दिघे, प्रकाश पंधाडे, पर्बत गाडेकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सर्वसामान्यांचे सण गोड करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आनंदाचा शिधा दिला जात आहे. चांगल्या दर्जाचा व त्यामध्ये आनखी वस्तूंची भर टाकून सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. दिवाळीला प्रत्येकाच्या घरात आनंद व उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न या योजनेद्वारे करण्यात आला आहे. विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकांचा विचार करुन त्यांना आधार दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते यांनी आनंदाच्या शिधाने सर्वांच्या घरात दिवाळी साजरी होणार आहे. आनंदाचा शिधा हा सर्वसामान्य वर्गाला दिलासा देणारा असून, सर्व लाभार्थींना याचा लाभ मिळत असल्याचे स्पष्ट केले. शिधापत्रिकाधारकांना दिला जाणारा आनंदाचा शिधा वाटप शहरात सुरु असून, नागरिकांचा देखील आनंदाचा शिधा घेण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
