गुरुनानक देवजी ग्रुपचा सामाजिक उपक्रम
दिवाळी आनंद वाटण्याचा सण -जनक आहुजा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील गुरुनानक देवजी ग्रुपच्या (जीएनडी) वतीने वंचितांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने वडगाव गुप्ता रोड, सावेडी येथील अपंग संजिवनी सोसायटीच्या मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिठाई व फराळचे वाटप करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावर मिठाई व फराळ मिळाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.
दिवाळीच्या सुट्टया लागल्यानंतर मुकबधीर विद्यालयाच्या वस्तीगृहातील मुले आपल्या घरी जाणार आहेत. त्यांची दिवाळी गोड होण्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांना फराळची भेट मिळण्यासाठी जनक आहुजा यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संजय आहुजा, जगधने सर आदींसह मुकबधीर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनक आहुजा म्हणाले की, दिवाळी हा आनंद साजरा करण्यापेक्षा आनंद वाटण्याचा सण आहे. दुर्बल, वंचित हे आपल्याच समाजातील घटक असून, त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. वंचितांची दिवाळी गोड करणे मोठे पुण्याचे काम असल्याचे त्यांनी सांगितले.
