साखळी उपोषणस्थळीच केले रक्तदान
मंत्रालयात बैठका फक्त खुर्च्या टिकवण्यासाठी -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथे सुरु असलेल्या साखळी उपोषणात ग्रामस्थांसह युवकांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला गावातील युवकांचा प्रतिसाद मिळाला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणात गुरुवारी (दि.2 नोव्हेंबर) रक्तदान करुन मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा अखिल भारतीय मराठा महासंघाचे नगर तालुकाध्यक्ष पै. नाना डोंगरे, अजय ठाणगे, तुकाराम फलके, बाबासाहेब जाधव, संजय फलके, संदीप निमसे, तुकाराम कापसे, अरुण कापसे, विजय गायकवाड, दिगंबर जाधव, डॉ. विजय जाधव, रामदास जाधव आदी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात विजय डोंगरे, भरत बोडखे, भाऊसाहेब जाधव, नवनाथ हारदे, विजय जाधव, भारत फलके, गणेश कापसे, अक्षय पवार, माजी सभापती रामदास भोर, राजेंद्र गुंजाळ, ऋषीकेश जाधव, सागर कापसे, विजय जाधव, शेखर उधार, सुरज सर, मारुती काळे, अर्जुन काळे, सचिन ठोकळ, अतुल फलके, हनुमंत सात्रळ, सदानंद जावक आदींसह युवकांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, आरक्षणासाठी मराठा समाजातील अनेक युवकांनी आत्महत्या केल्या. मात्र तरी देखील सरकारला जाग आलेली नाही. आंदोलनाने फक्त सरकार जागे झाले असून, आरक्षणाचा प्रश्न ते गंभीरतेने घेत नाही. मंत्रालयात बैठका फक्त खुर्च्या टिकवण्यासाठी सुरु असून, त्यांचा मराठा आरक्षणाकडे लक्ष नाही. गावातील जीव देऊन नव्हे तर रक्तदान करुन आरक्षणाची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. या रक्तदान शिबिरासाठी जनकल्याण रक्तपिढीचे डॉ. गुलशन गुप्ता, शरद बळे, शंकर खंडागळे, किशोर यादव, मोहन शर्मा, गया चव्हाण, अनिता तरटे यांचे सहकार्य लाभले.