• Wed. Mar 12th, 2025

श्री मार्कंडेय नागरी सहकारी पसंस्थेच्या निवडणुकीत जनसेवा पॅनलचा दणदणीत विजय

ByMirror

Oct 31, 2023

विरोधकांचा उडविला धुव्वा; सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी जनसेवा पॅनलने सर्वच्या सर्व 11 जागा जिंकत संस्थेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. विरोधी परिवर्तन पॅनलला या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.


संस्थेच्या 11 जागांसाठी नुकतीच मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अल्ताफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला. सर्वसाधारण मतदार संघ 6, महिला राखीव 2, इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती व विशेष मागासवर्ग प्रत्येकी 1 अशा एकूण 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत बलराज सामाल यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी जनसेवा पॅनलने सर्व जागा जिंकत बहुमत मिळवून विरोधकांचा धुव्वा उडविला. माजी चेअरमन नारायण कोडम व व्हाईस चेअरमन विनायक मच्चा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळाने केलेल्या उत्कृष्ट कार्याला सभासदांनी त्यांच्या बाजूने कौल दिला आहे. तर निवडणुकीपूर्वी विरोधकांनी केलेले सर्व आरोप सभासदांनीच हाणून पाडल्याचे चित्र निवडणुकीतून पहावयास मिळाले.


या निवडणुकीतील जनसेवा पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे:- सर्वसाधारण मतदारसंघ- उमेश चंद्रय्या इराबत्तीन (734 ), दत्तात्रय विठ्ठल अंधे (683), नारायण विश्‍वनाथ कोडम (688), संजय कृष्णाहारी चिप्पा (686), शेराल अशोक भूमय्या (681), बालराज राजय्या सामल (700), अनुसूचित जाती मतदारसंघ-गौतम नाथू भिंगारदिवे (711), महिला राखीव- सविता प्रकाश कोटा (647), प्रमिला अंबादास बिंगी (646), इतर मागासवर्ग- गणेश सदाशिव वेदपाठक (731), विशेष मागासवर्ग- विनायक विश्‍वनाथ मच्चा (711).


परिवर्तन पॅनलचे पराभूत उमेदवार व त्यांना मिळालेली मते:- सर्वसाधारण मतदारसंघ प्रवीण नारायण कोडम (346), गोरख भास्कर गाली (340), प्रशांत अंबादास गोसके (322), दत्तात्रय राजन्ना जोग (422), नारायण ईश्‍वरय्या न्यालपेल्ली (350), राजेंद्र रामदास म्याना (356), अनुसूचित जाती- संजीव लक्ष्मण बगळे (384), सुरेखा गोविंद आडम (462), संध्या सुनील शिरसुल (417), इतर मागासवर्ग- सागर दत्तात्रेय लोळगे (369), विशेष मागासवर्ग- रमेश यलय्या नागुल (388).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *